शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

४९५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी

By admin | Updated: August 7, 2014 23:31 IST

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारणसभेमध्ये ४९५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

परभणी: परभणी शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारणसभेमध्ये ४९५ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. येथील बी. रघुनाथ सभागृहामध्ये ७ आॅगस्ट रोजी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक बैठक पार पडली. महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयुक्त अभय महाजन, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. २०१३-१४ च्या सुधारित व २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. ४९५ कोटी ३२ लाख ६० हजार ९३१ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्याचप्रमाणे या बैठकीत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीसाठी १ लाख रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी ७५ हजार, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीसाठी ५० हजार, बी. रघुनाथ जयंतीसाठी ५० हजार, प्राचार्य रामदास डांगे यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला व विविध कार्यक्रमांसाठी ५० हजार , माजी नगराध्यक्ष मीर हाशम अली यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ५० हजार, ईद- ए-मिलादूनबीसाठी ५० हजार, वारकरी भवनासाठी १ कोटी रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला.या बैठकीस विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, शिवसेना गटनेते अतुल सरोदे, दिलीप ठाकूर, उदय देशमुख, सचिन देशमुख, व्यंकट डहाळे, अश्विनी वाकोडेकर, स्वाती खताळ, मेहराज कुरेशी, हसीब उर रहेमान, डॉ.विवेक नावंदर, अ‍ॅड.जावेद कादर, शिवाजी भरोसे, गुलमीर खान कलंदर खान, विजय धरणे यांनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)अशी केली निधीची तरतूद२०१४-१५ या वर्षासाठी होणाऱ्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार परिवहन व्यवस्थेसाठी जेएनएनआरयूएम अंतर्गत ३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. युआयडीएसएसएमटी योजनेसाठी ३० कोटी रुपये निधी घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणि राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेसाठी ५ कोटी रुपये, रमाई घरकुल योजनेसाठी १६.८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. घरपट्टी केली माफपरभणी शहराच्या हद्दीत राहणाऱ्या माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या एका राहत्या घरास १ एप्रिल २०१४ पासून १०० टक्के घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.