शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

वाहन निरीक्षकांच्या नेमणूका औरंगाबादच्या; काम करताहेत मुंबईत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 7:44 PM

वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात २७ मोटार वाहन निरीक्षक कार्यरत होते; परंतु संख्या आजघडीला अवघी ७ वर आली आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून प्रतिनियुक्तीवरमनुष्यबळाची टंचाई 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील पाच मोटार वाहन निरीक्षक वर्षभरापासून प्रतिनियुक्तीवर मुंबईत कामकाज करीत आहेत. काम मुंबईत आणि वेतन औरंगाबादेतून अशी परिस्थिती आहे. यात भर म्हणून महिनाभरापूर्वी सहा निरीक्षकांची बदली झाली आणि आरटीओ कार्यालयातील एक-एक कामकाज मनुष्यबळाअभावी विस्कळीत होत आहे. त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे.

परिवहन विभागाने मे २०१८ मध्ये सहायक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती दिली. या पदोन्नतीने औरंगाबादला ११ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे आरटीओ कार्यालयाचे मनुष्यबळ वाढण्याची चिन्हे असतानाच पाच निरीक्षकांची प्रतिनियुक्ती मुंबईला करण्यात आली. गेल्या वर्षभरापासूनच ते मुंबईत काम करीत आहेत. वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात २७ मोटार वाहन निरीक्षक कार्यरत होते; परंतु संख्या आजघडीला अवघी ७ वर आली आहे.मनुष्यबळाअभावी शिकाऊ वाहन परवाना, पक्का वाहन परवाना, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, नवीन वाहन नोंदणी, भरारी पथक, विविध शासकीय बैठका अशा विविध कामांची जबाबदारी निरीक्षकांना पार पाडावी लागत आहे. 

या सगळ्या परिस्थितीत किमान मुंबई येथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांना औरंगाबादेत परत पाठविण्याची आवश्यकता आहे; परंतु परिवहन विभागाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते म्हणाले, मनुष्यबळ मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. 

मोटार वाहन निरीक्षकांची परिस्थितीमंजूर पदे    - ३०भरलेली होती    -२४मुंबईत प्रतिनियुक्ती    - ५निलंबित (नंतर इतर ठिकाणी बदली)    - ५सेवानिवृत्त    - १बदली    -६सध्या कार्यरत    -७सहाय मोटार वाहन निरीक्षकांची स्थितीमंजूर पदे     - ४०भरलेली    - ५    

या कामांवर झाला परिणामशिकाऊ वाहन परवाना  - रोज २०० ऐवजी १०० जणांची चाचणी.कायमस्वरूपी परवाना                    - रोज २४० ऐवजी १३० जणांची चाचणी.फिटनेस तपासणी        - रोज १४८ जणांना अपॉइंटमेंट.नव्या वाहनांची नोंदणी -शोरूमऐवजी आरटीओ कार्यालयात

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद