औरंगाबाद : विभागीय आयुक्तालयातील महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, पैठण महसूल प्रबोधिनीतील अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांच्यासह राज्यातील २३ जणांना निवड श्रेणी संवर्गात पदोन्नती मिळाली आहे. २०१५-१६ च्या प्रस्तावित निवडसूचीच्या अनुषंगाने निवड श्रेणीच्या रिक्त जागांवर अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातून पदोन्नती देण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार बुधवारी शासनाने राज्यातील २३ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. के. एच. कुलकर्णी, पी.टी. वायचळ, आर. बी. भागडे, वाय. पी. म्हसे, ए. एन. करंजकर, एम. एम. सूर्यवंशी, आर. एस. ठाकरे, सूरज मांढरे, एस. जी. कोलते, आर. डी. निवतकर, ए. ए. गुल्हाने, के. व्ही. जाधव, जी. एम. बोडके, ए. व्ही. काकडे, बी. के. घेवारे, जे. टी. पाटील, एस. एस. भागवत, एस. एस. पाटील, टी. एम. बागूल, पी. व्ही. कचरे, पी. एच. कदम आदी २३ जणांचा पदोन्नती झालेल्यांत समावेश आहे.
अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणीत २३ जण
By admin | Updated: June 30, 2016 01:24 IST