शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लिपकार्टच्या संचालकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:10 IST

तलवारी, चाकू आणि जांबियासारखी घातक शस्त्रे आॅनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट आणि इन्स्टाकार्टच्या संचालकांना गुन्हे शाखेकडून नोटिसा प्राप्त होताच, या दोन्ही कंपन्यांच्या संचालक आणि व्यवस्थापकाने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतल्याचे समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तलवारी, चाकू आणि जांबियासारखी घातक शस्त्रे आॅनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट आणि इन्स्टाकार्टच्या संचालकांना गुन्हे शाखेकडून नोटिसा प्राप्त होताच, या दोन्ही कंपन्यांच्या संचालक आणि व्यवस्थापकाने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतल्याचे समोर आले. हे प्रकरण सुनावणीसाठी २२ जून रोजी ठेवण्यात आले असून, न्यायालयाने गुन्हे शाखेला त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.शहरात आॅनलाईन खरेदीद्वारे अनेक नागरिकांनी फ्लिपकार्ट आणि इन्स्टाकार्ट या आॅनलाईन शॉपिंग करणाºया कंपन्यांकडून शस्त्रे मागविली होती. त्याचा महिनाभरापूर्वी पोलिसांनी भंडाफोड केला होता. याप्रकरणी शहरातील दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी फ्लिपकार्ट शॉपिंग पोर्टलचे संचालक आणि इन्स्टाकार्ट या कुरिअर कंपनीच्या मॅनेजर, संचालकाविरोधातही गुन्हे नोंदविले. या प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ४१ शस्त्रे जप्त केली. याप्रकरणी जबाब देण्यासाठी गुन्हे शाखेत हजर होण्याच्या नोटिसा पोलिसांनी या कंपन्यांच्या संचालक आणि मॅनेजरर्संना पाठविल्या होत्या. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्याच्या उद्देशाने दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मुंबईत मंत्रालय पातळीवरून सूत्रे हलविली आणि कारवाई टाळण्याचा प्रयत्न के ला. मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाºयांनी गुन्हे शाखेच्या अधिकाºयांना मंत्रालयात बोलावून घेतले त्यावेळी पोलिसांची बाजू भक्कम असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी स्पष्टपणे मांडले होते. आता या प्रकरणात अटक होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन इन्स्टाकार्ट कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रशेखर शर्मा (मूळ रा. सिमला, ह. मु. ठाणे पश्चिम) यांनी आणि फ्लिपकार्टचे(सिटी लॉजेस्टिक) संचालक कमल दास (मूळ रा. फरिदाबाद, ह.मु. अंधेरी पूर्व, मुंबई) यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी औरंगाबादेतील सत्र न्यायालयात ११ जून रोजी धाव घेतली. याप्रकरणी २२ जूनपर्यंत म्हणणे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने गुन्हे शाखेला दिले आहेत.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारCourtन्यायालय