चालू वर्षी खरीप हंगामात कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. पहिल्या दोन वेचणीनंतर गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढला व उत्पन्नात ४० ते ५० टक्के घट झाल्याचे दिसून आले. सध्या कापसाच्या सर्व वेचण्या पूर्ण झालेल्या असून काही शेतकरी कापसाचे फरदड पीक घेत असल्याचे दिसून येत आहे. गुलाबी बोंडअळींचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी शेत ४ ते ५ महिने कापूसविरहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील सर्व शेतकऱ्यांनी ३१ जानेवारीअखेर शेतातील उभे कापूस पीक नष्ट करणे आवश्यक आहे. यावेळी कृषी विक्रेते विलास सुरासे, नानासाहेब चंद्रटिके, काकासाहेब खोसरे, नारायण बर्डे, प्रकाश झाल्टे, विकास हारदे, विठ्ठल पाटे, विठ्ठल दांगोडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : गल्लेबोरगाव येथे शेतकऱ्यांना माहिती देताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी अशोक खेडकर.