शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणासाठी काहीही; ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:चेच अपत्य नाकारणाऱ्यावर फौजदारीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 11:36 IST

ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी स्वत:ची मुलगी भावाची असल्याचे दर्शविणाऱ्याला  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरविले.

ठळक मुद्देखंडपीठाने त्याला साह्य करणारा त्याचा भाऊ या दोघांना पाच लाख रुपये दंड ठोठावला. तसेच या दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेशही दिले.

औरंगाबाद : ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी स्वत:ची मुलगी भावाची असल्याचे दर्शविणाऱ्याला  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरविले. खंडपीठाने त्याला साह्य करणारा त्याचा भाऊ या दोघांना पाच लाख रुपये दंड ठोठावला. तसेच या दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेशही दिले. 

दंडाच्या पाच लाख रुपयांपैकी एक लाख रुपये औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयाला, एक लाख रुपये घाटी रुग्णालयातील गरीब रुग्णांकरिता आणि तीन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेशात म्हटले आहे. ३१ आॅगस्टपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास  स्वत:हून अवमानाची कारवाई सुरू करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन महसूल अधिनियमान्वये वसुलीची कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. तीन अपत्यांमुळे अपात्रतेपासून वाचण्याकरिता राजकारणी विविध युक्ती वापरताना  दिसतात. याला आळा बसावा, असा निकाल शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठाने दिला. 

सुनावणीदरम्यान खंडपीठाने याचिकेतील आक्षेपानुसार अपत्याचे खोटे प्रमाणपत्र दाखल करून आपली मुलगी भावाची असल्याचे सांगितल्याप्रकरणी भावाची मुलगी बुशरा हिची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते. अ‍ॅड. ठोंबरे यांनी मुनाफने आपली मुलगी सायमा उर्फ महेविश ही भाऊ मिनाजची मुलगी असल्याचे दाखविले आहे. मिनाजला स्वत:ला  बुशरा नावाची मुलगी असून, दोघींच्या जन्मात केवळ ३९ दिवसांचे अंतर असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.  यावर खंडपीठाने सायमा उर्फ महेवीश आणि मिनाजचीही डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले.  

सुनावनीत मुनाफचा भाऊ मिनाज  याने डीएनए चाचणीचा आदेश मागे घ्यावा अशी विनंती केली. आपल्याला बुशरा ही एकच मुलगी असून, सायमा कुणाची मुलगी आहे हे आपल्याला माहिती नसल्याचे नमूद केले. सुनावणीत मुनाफने सायमा ही आपलीच मुलगी असल्याचे मान्य केले. शासनातर्फे अ‍ॅड. सुभाष तांबे यांनी, असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खंडपीठाने याची गंभीर दाखल घेऊन, जास्तीत जास्त कठोर शासन करण्याची विनंती केली. याचिकाकत्यातर्फे अ‍ॅड. सिध्देश ठोंबरे यांनी काम पाहिले. 

काय आहे प्रकरण?पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची ग्रामपंचायतीची निवडणूक २०१५-१६ मध्ये मुनाफ सुभेदार शेख यांनी लढविली होती. मुनाफ यांनी निवडणुकीत बिलाल इसाक शेख यांना पराभूत केले. मुनाफने निवडणुकीपूर्वी अपत्यांसंबंधी सादर करावयाच्या शपथपत्रात दोन मुले असल्याचे नमूद केले होते. मुनाफच्या या शपथपत्रावर पराभूत उमेदवार बिलाल यांनी आक्षेप घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे मुनाफच्या अपात्रतेसंबंधी अर्ज सादर केला. मुनाफला चार अपत्ये असल्याचा आक्षेप घेत त्याचे विवरणही सादर केले होते. मुनाफला तिसरे अपत्य २२ मार्च २००४ तर चौथे ३० आॅगस्ट २००६ रोजी झालेले आहे, असे त्यात म्हटले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून मुनाफला ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. या विरुद्ध मुनाफने अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले असता त्यांनी त्याचे सदस्यत्व बहाल केले. याला बिलालने खंडपीठात आव्हान दिले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद