शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जगातील कोणताही सिनेमा भावनिकदृष्ट्या मनाला भिडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:20 IST

कोणताही चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो. कलेला सीमा नसतात. जगातील कोणताही चित्रपट भावनिकदृष्ट्या तुमच्या मनाला भिडतो. हेच या चित्रपट माध्यमाचे यश असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देमधुर भांडारकर : सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

औरंगाबाद : कोणताही चित्रपट महोत्सव आपल्याला घडवतो. कलेला सीमा नसतात. जगातील कोणताही चित्रपट भावनिकदृष्ट्या तुमच्या मनाला भिडतो. हेच या चित्रपट माध्यमाचे यश असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी येथे केले.सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भांडारकर बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, दिग्दर्शक एन. चंद्रा, निर्माते किरण शांताराम, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, युरोपीय अभिनेत्री मारियान बोर्गे, लेखक दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी, भांडारकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या आंतरराष्ट्रीय महोत्सवाची टाळ्यांचा गजरात सुरुवात झाली. भांडारकर म्हणाले की, देश-विदेशातील ४० चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. ही चित्रपट रसिकांसाठी पर्वणी होय. यातील काही भाषा रसिकांना समजणार नाही; पण चित्रावरून व त्यातील कलाकारांचे हावभाव यावरून त्या चित्रपटाची कथानक लक्षात येते व त्यातील संदेश रसिकांच्या मनाला भिडतोच. मात्र, आता बदलत्या तंत्रज्ञानानुसार आता चित्रपट क्षेत्राने बदलणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करीत अशा आयोजनांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे आवश्यक असल्याचे, एन. चंद्रा यांनी नमूद केले. दिग्दर्शक आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर कमी व्हावे. असे मत किरण शांताराम यांनी मांडले. मराठी चित्रपटांचा स्वतंत्र सशुल्क महोत्सव भरवावा, अशी सूचना चंद्रकांत कुलकर्णी यांनी केली. यावेळी मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी केले. यावेळी नीलेश राऊत, सचिन मुळे, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद आदींची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘कोल्ड वॉर’ (पोलंड) हा चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात झाली. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा चित्रपटात प्रभावीपणे दाखविण्यात आली. या महोत्सवात प्रोझोन मॉल आयनॉक्स येथे १३ जानेवारीपर्यंत दररोज चित्रपट दाखविण्यात येणार आहे.चौकटगिरी कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कारचित्रपट महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शक गिरी कासारवल्ली यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यास उत्तर देताना कासारवल्ली म्हणाले की, माझ्या चित्रपट कारकीर्दीच्या चाळीसाव्या वर्षात मिळालेल्या या पुरस्काराने इतर सर्व पुरस्कारांच्या तुलनेने अधिक आनंद झाला आहे. मानवी मनाच्या विकासात चित्रपट प्रभावी माध्यम आहे. मराठी चित्रपटाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 

टॅग्स :Madhur Bhandarkarमधुर भांडारकर Aurangabadऔरंगाबाद