शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने घेतलेला आणखी एक बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:44 IST

सोशल मीडियाचे वेड : संशयपिशाच्चाने उडवले पत्नीचे मस्तक!

श्यामकुमार पुरेसिल्लोड : ती सतत फोनवर बोलते, व्हॉटस् अ‍ॅप, यूट्यूब बघते, तिचा फोन नेहमी बिझी असतो, म्हणून तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील, अशा संशयाचे भूत डोक्यात घुसल्याने १४ आॅगस्ट रोजी पतीने चक्क पत्नीचे मुंडके छाटले होते. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून मी पत्नीवर खूप प्रेम करायचो, पण ती सतत फोनवर बोलायची, यामुळे तिचा खून केला. आता खून केल्याचा मला खूप पश्चाताप होतोय, असे आरोपीने पोलिस तपासात सांगितले.सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मागील आठवड्यात ही भयंकर घडली होती. खून करणारा आरोपी पती रवींद्र बनकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यासह मयत विवाहितेचा सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर यांना न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर सासू लंकाबाई साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर या दोघांना हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे. खून पतीने केला असला तरी तिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करणारे, शारिरीक, मानसिक त्रास देणारे सासू, सासरे, दीर, जाऊ हे सर्वच पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत.११ वर्षांपूर्वी झाले होते लग्नदेऊळगाव बाजार हे चारशे ते पाचशे उंबऱ्याचे गाव. येथील रहिवासी रवींद्र साहेबराव बनकर (३०) याचे ११ वर्षांपूर्वी मंगला हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्या संसारवेलीवर सागर (४) व भक्ती (६) ही दोन फुले उमलली. रवींद्र हा शेती व व्यापार करत असे. सर्व काही सुरळीत असताना त्यांच्या संसाराला संशयाच्या भुताने घेरले, अन् ही घटना घडली.वारंवार समजवूनही ती ऐकत नाही, यामुळे तिचे नक्की कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील. तिच्यात बदल होत नाही, ती मला फसवत आहे. समाजात मला तोंड दाखवायला जागा उरली नाही, अशा संशयातून त्याने टोकाचे पाऊल उचलले व रागाच्या भरात रात्री पत्नीचे मुंडके छाटले.पोलिसांचे कौशल्यघटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, सहायक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप सावळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याच दिवशी खुनात वापरलेली धारदार कुºहाड पोलिसांनी जप्त केली व गुन्हा उघडकीस आणला. यापूर्वीही केळगाब येथे बापाने मुलाचा खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला होता.दोन्ही मुले अनाथपती-पत्नी हे सुखी संसाराच्या गाडीचे दोन चाके असतात. यातील एकही वाकले, त्याला तडा गेला तर काय होते. हे या घटनेवरून दिसून येते. मंगलाचा जीव गेला तर सागर आणि भक्ती हे सर्व काही असताना मातृवात्सल्यापासून अनाथ झाले आहेत.