शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आणखी एक बुकी पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: June 2, 2015 00:25 IST

औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविणाऱ्या टोळीतील आणखी एका बुकीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली.

औरंगाबाद : आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविणाऱ्या टोळीतील आणखी एका बुकीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली. धीरज उर्फ पवन वर्मा (रा. भवानीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आॅनलाईन सट्टा खेळविणाऱ्या सट्टेबाजांचा गत महिन्यात पर्दाफाश केला होता. उस्मानपुरा भागात स्वत:च्या घरात मिनी टेलिफोन एक्स्चेंज उभारून बुकींना लाईन देणाऱ्या नरेश पोतलवाड याच्यासह सहा जणांना कारवाईच्या दिवशी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी धाड मारली त्याप्रसंगी २८ बुक ी आॅनलाईन सट्टा खेळवीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केलेली आहे. यात दिल्लीतील दोन बुकींचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी धीरज वर्मा हा उच्च शिक्षित आहे. पोलिसांनी धाड मारली त्या दिवशी तो नरेश पोतलवाडच्या मिनी टेलिफोन लाईन एक्स्चेंजशी कनेक्ट होता. मात्र, तो गावाबाहेर असल्याने पोलिसांना मिळाला नव्हता. दरम्यान, पोलिसांनी धाड मारल्याचे कळताच तो फरार झाला होता. दरम्यान, तो शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यास रविवारी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास ५ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आॅन लाईन सट्टा खेळविणारे फरार बुकींचा पोलीस शोध घेत आहेत. यापैकी काही बुकींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.