शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी२०० कर्मचारी जाणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:45 IST

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तिजोरीवरील ‘भार’ हलका करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगमधून तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचा-यांना घरी पाठविण्याचा सपाटा आयुक्तांनी लावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तिजोरीवरील ‘भार’ हलका करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आऊटसोर्सिंगमधून तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची भरती केली होती. या कर्मचा-यांना घरी पाठविण्याचा सपाटा आयुक्तांनी लावला आहे. पहिल्या टप्प्यात १८७ कर्मचारी कमी करण्यात आले. आता सहा विभागांमधील जवळपास २०० कर्मचारी कमी करण्यात येणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी या सर्व विभागांचा आढावा घेऊन अहवाल द्यावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.महापालिकेत छोट्या-मोठ्या कामांसाठी आऊटसोर्सिंग, प्रकल्प सल्लागार समिती धूमधडाक्यात नेमल्या जात होत्या. यामुळे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू होती. गरज नसताना राजकीय दबावापोटी कर्मचारी भरती करण्यात आली. राजकीय मंडळींनीही आपल्या नातेवाईकांना आऊटसोर्सिंगच्या भरतीमध्ये ‘सेट’ केले. ११०० कर्मचा-यांच्या पगारापोटी दरमहा १ कोटी ६५ लाख रुपये खर्च होत आहेत, तरीही कर्मचा-यांकडून पाहिजे तसे काम होत नाही. त्यामुळे अनावश्यक कर्मचा-यांना कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मागील आठवड्यात १८७ कर्मचारी कमी करण्यात आले. आता सहा विभागप्रमुखांना अतिरिक्त कर्मचा-यांची यादी देण्याचे निर्देश दिले आहेत.अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सहा विभागांचा बारकाईने आढावा घेऊन अहवाल द्यावा, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे. कारवाईमुळे आऊटसोर्सिंगच्या कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. अतिरिक्त कर्मचारी म्हणून आपले नाव यादीत येऊ नये म्हणून राजकीय पाठबळ मिळविण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणात सुरू झालाआहे.आकृतिबंध डोळ्यासमोर ठेवूनमहापालिकेला सध्या किती कर्मचा-यांची गरज आहे, यादृष्टीने आकृतिबंध तयार केला आहे. भविष्यात किती कर्मचारी लागतील, याचाही विचार आकृतिबंधामध्ये केला आहे. आऊटसोर्सिंगचे कर्मचारी कमी करताना आयुक्त आकृतिबंध डोळ्यासमोर ठेवत आहेत. आवश्यक आणि कर्मचारी कामात निपुण आहेत किंवा नाही, याची माहिती घेऊन त्यांना कामावर ठेवण्यात येणारआहे.

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादEmployeeकर्मचारी