शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

हिडींबाची पूजा करणारे अनोखे पारध गाव

By admin | Updated: September 15, 2015 00:31 IST

पारध : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवर वसलेले पारध (शाहुराजा) हे गाव ऐतिहासिक, सांस्कृतिकतेबरोबरच पौराणिक परंपरा शेकडो वर्षापासून जपणारे गाव.

पारध : भोकरदन तालुक्यातील मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवर वसलेले पारध (शाहुराजा) हे गाव ऐतिहासिक, सांस्कृतिकतेबरोबरच पौराणिक परंपरा शेकडो वर्षापासून जपणारे गाव. एखाद्या गावात देवी-देवतांची पूजा, त्यांची यात्रे म्हटले तर नवल वाटण्यासारखे नाही. पारधची यात्रा म्हणजे नवलच म्हणावे लागेल. ही यात्रा चक्क घटत्कोच माता हिडींबेच्या नावाने भरते आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंडपणे सुरु आहे. या यात्रेस सोमवारपासून सुरुवात होणार आहे.ही यात्रा १४ सप्टेंबर म्हणजे सोमवारपासून तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचीही रेलचेल असणार आहे. लगतच्या विदर्भ, खान्देशासह मराठवाड्यातून हजारो भाविक हिडींबीच्या दर्शनासाठी पारध येथे डेरेदाखल होतात. त्या अनुषंगाने भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पारध ग्रामपंचायत प्रयत्नशिल असल्याची माहिती सरपंच गणेश लोखंडे, पं. स. सभापती संगीता लोखंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून आम्ही सर्व बंदोबस्त चोख ठेवल्याचे पारध पोलिस ठाण्याचे स. पो. नि. किरण बिडवे यांनी सांगितले.पारध हे जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व पौराणिक वारसा लाभलेले प्रसिध्द देवस्थान आहे. येथे कौरव पांडवाचे पूर्वज महाकवी व्यासांचे पिता महर्षि पाराशर ऋषींचे भव्य मंदीर आहे. पाराशर ऋषींची आवतार समाप्ती येथे झाल्याने या पुण्यभूमिला पारध असे नाव पडल्याचा उल्लेख आहे. नेमी याच काळात या भागात घटत्कोच माता हिंडीबी ही राक्षसीन काहीकाळ वास्तव्यास होती. तिने सुंदर स्त्रीचे रुप धारण करुन आपल्या अप्रतिम सौंदर्याने महाशक्तीसाठी भिमाला मोहीत केले व भीमासोबत विवाह केला म्हणून तिलाही देवत्व प्राप्त झाले, असा उल्लेख महाभारत ग्रंथात आहे. म्हणून पारध येथे भाद्रपद महिन्याच्या शुध्द द्वितीयेला महर्षी पाराशर ऋषी सोबतच हिडींबीचीही मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात येते. आणि या यात्रेला हिडींबा यात्रा उत्सव म्हणून शेकडो वर्षापासून ओळखल्या जातो. मिरवणूकीत वाघ्या-मुरळी, भजने आदी करमणूकीचे कार्यक्रम सादर होतात. तीन दिवस कुस्त्यांची दंगलही होते. यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी सरपंच गणेश लोखंडे, उपसरपंच सुरेश अल्हाट, पं. स. सभापती संगीता लोखंडे, देवीराम तेलंग्रे, पांडुरंग बोराडे, समाधान गुरुजी, परमेश्वर पाटील, दिलीप बेराड, देवेंद्र पाटील, रामदास राऊत, अमाल भुजारे, गजानन जंजाळ, विनोद तेलंग्रे, बाबासाहेब देशमुख, शेषराव भुसारे, शेखर श्रीवास्तव, प्रमोद सूरडकर हे प्रयत्नशील आहेत.