शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

१०३ उमेदवारांची अंतिम निवड जाहीर

By admin | Updated: June 18, 2014 01:30 IST

हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त असलेल्या १०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त असलेल्या १०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तात्पुरत्या यादीवर एकही आक्षेप न आल्याने भरतीप्रमुख तथा अप्पर पोलिस अधीक्षक शाम घुगे, प्रभारी समादेशक ए.एल.फुफाटे यांनी उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली आहे.या प्रकियेत १०३ जागांसाठी २ हजार ८९५ उमेदवारांनी अर्ज भरला होता. कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेतल्यानंतर २ हजार २६५ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले होते. त्यातील १३५४ जण लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले. परंतु परिक्षेला ४८ उमेदवार गैरहजर राहिल्याने केवळ १ हजार ३०६ उमेदवारांचीच परीक्षा घेण्यात आली. परिक्षेनंतर लगेच उत्तरपत्रिकांची तपासणी करून निकाल जाहीर करून तात्पुरत्या स्वरूपातील निवड यादी लावण्यात आली. त्यावर कुणाला आक्षेप असल्यास २४ तासाच्या आत तक्रार नोंदवण्याची सुचनाही देण्यात आली होती. परंतु याबाबत एकही तक्रार न आल्याने रविवारी दुपारी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. गुणवत्ता व प्रवर्गानुसार १०३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गाच्या ४९ जागा भरताना २ प्रकल्पग्रस्त, २ खेळाडू, १ भुकंपग्रस्त व ४४ नियमित उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. अनुसुचित जातीच्या ११ जागांमध्ये १ प्रकल्पग्रस्त, १ बॅन्डस्मन या उमेदवारांचा समावेश आहे. अनुसुचित जमाती-१२, डीटीए-४, एनटीबी-३, विशेष मागास प्रवर्गाच्या ६ जागांसाठी नियमित उमेदवार निवडण्यात आले आहेत. एनटीडीच्या ७ जागांमध्ये एका अनुकंपाधारकाची निवड झाली आहे. ओबीसीच्या ११ जागांमध्येही प्रकल्पग्रस्त, खेळाडू व होमगार्ड यांना प्रत्येकी १ अशा ३ जागा मिळाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी भरतीप्रमुख म्हणून काम पाहिले. एसआरपीएफचे प्रभारी समादेशक ए.एल.फुफाटे यांनी त्यांना सहकार्य केले. एसआरपीएफच्या अंतिम निवड यादीतील शेवटच्या उमेदवारांचे गुण (कट आॅफ लाईन) खुला प्रवर्ग- १७३, अनुसुचित जाती-१६६, अनुसुचित जमाती-१५३, डीटीए-१७०, एनटीबी-१६९, एनटीडी-१६६, एसबीसी-१५२, ओबीसी-१६९ असे आहेत. (प्रतिनिधी)