औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, उन्हाळी सुट्यानंतर १५ जून रोजी शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे. महाविद्यालय पातळीवर पदव्युत्तर प्रवेशासाठी ६ जून ते १४ जूनदरम्यानच प्रवेश परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.विद्यापीठ प्रशासनाने आगामी शैक्षणिक वर्षातील वेळापत्रक शनिवारी सायंकाळी जाहीर केले. या वेळापत्रकानुसार उन्हाळी सुट्यानंतर १५ जून रोजी महाविद्यालये उघडणार आहेत. तत्पूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी महाविद्यालयांनाच ६ ते १४ जूनदरम्यान प्रवेशासाठी सीईटी घ्यावी लागणार आहे. या सीईटीची व्याप्ती ही केवळ महाविद्यालयापुरतीच मर्यादित असणार आहे. या वेळापत्रकानुसार सीईटी झाल्यानंतर १५ जून ते १ जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यानंतर प्रत्यक्ष शिकवणीला २ जुलैपासून सुरुवात होणार आहे. १९ आॅक्टोबरपर्यंत पहिल्या सत्रातील शिकवणी वर्ग सुरू राहतील. यात दिवाळीच्या सुट्या २१ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान असतील. त्यानंतर ११ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली. पहिले सत्र संपल्यानंतर दुसऱ्या सत्रातील शिकवणीला ६ डिसेंबर रोजी सुुरुवात होईल. हे सत्र १४ मार्चपर्यंत सुरू राहील. तर १६ मार्चपासून द्वितीय सत्रातील परीक्षांना सुरुवात होईल. या परीक्षा २० एप्रिल रोजी संपतील, असेही या वेळापत्रकात म्हटले आहे. या वेळापत्रकानुसार युवक महोत्सव १ ते १० सप्टेंबर या काळात आयोजित केला जाणार आहे. आविष्कार महोत्सव २७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान होणार असल्याचे डॉ. तेजनकर यांनी सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. मात्र अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही शासनस्तरावर होत असल्यामुळे केवळ परीक्षा आणि सत्र सुरू होण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच विद्यापीठातील विभागांचे वेळापत्रकही महाविद्यालयांप्रमाणेच असणार आहे. त्यात काही किरकोळ बदलही करण्यात आलेले आहेत.वर्षभरात मिळणार २५ सुट्यामहाविद्यालय, विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना चालू वर्षात तब्बल २५ सार्वजनिक सुट्या मिळणार आहेत. यामध्ये तीन सुट्या रविवारी आल्या आहेत. यात विविध सण, उत्सव, महान पुरुषांच्या जन्मदिनाच्या सार्वजनिक सुट्यांचा समावेश आहे.------------
विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:20 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, उन्हाळी सुट्यानंतर १५ जून रोजी शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे. महाविद्यालय पातळीवर पदव्युत्तर प्रवेशासाठी ६ जून ते १४ जूनदरम्यानच प्रवेश परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर झाले असून, उन्हाळी सुट्यानंतर १५ जून रोजी शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे. महाविद्यालय पातळीवर पदव्युत्तर प्रवेशासाठी ६ जून ते १४ जूनदरम्यानच प्रवेश परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर
ठळक मुद्देनियोजन : १५ जून रोजी सुरू होणार २०१९-२० शैक्षणिक वर्ष; प्रवेश चाचणीच्या तारखा जाहीर