शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन आता ऑक्टोबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:42 IST

यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे.संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापन

औरंगाबाद : साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. त्यात स्थापनेनुसार बदल करून तो आता ऑक्टोबर महिन्यात घेण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, महामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे. त्यामुळे यापुढे फेब्रुवारीमध्ये होणारा वर्धापन दिन ऑक्टोबरमध्ये घ्यावा, असे ठरले. त्यानुसार यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. मराठी भाषा शिक्षण कायद्याबरोबरच मराठी भाषेच्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या मराठी शाळा सुरू ठेवण्याचा आणि नवीन शाळांना मान्यता देण्याच्या प्रश्नांविषयीही विचार करण्यात आला आणि हे प्रश्न महामंडळाने शासनासमोर मांडावेत, असा निर्णय बैठकीत झाला.

हैदराबादचे मराठी महाविद्यालय बंद करण्यात यावे, असे तेलंगणा सरकारने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला कळवले आहे. हा प्रश्न अल्पसंख्याकांच्या भाषेच्या मूलभूत हक्काचा असून, वकिलाच्या साहाय्याने हे प्रकरण न्यायालयात न्यावे आणि त्यासाठी निधी साहित्य महामंडळ उपलब्ध करून देईल, असा निर्णय झाला. महामंडळाचे वार्षिक अक्षरयात्राच्या संपादक मंडळाची नियुक्तीही यावेळी करण्यात आली. डॉ. दादा गोरे हे संपादक म्हणून काम पाहतील, तर सल्लागार मंडळात सुनीता राजे पवार (पुणे), डॉ. गजानन नारे (अकोला), डॉ. उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई) आणि डॉ. रामचंद्र काळुंखे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. काळुंखे यांनी २०१९-२० चा अर्थसंकल्प मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ठाले पाटील यांच्यासह डॉ. गोरे, डॉ. विद्या देवधर, डॉ. काळुंखे, विलास मानेकर, डॉ. गजानन नारे आदींची उपस्थिती होती.

संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापनसाहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठित करण्यात आली. या समितीत उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे डॉ. प्रदीप दाते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे. संमेलनासाठी आलेल्या चार निमंत्रणांमधून उस्मानाबाद आणि नाशिक या दोन ठिकाणी ही समिती भेट देईल आणि अहवाल महामंडळाकडे सादर करील. त्यानुसार पुढील बैठकीत साहित्य संमेलनाच्या स्थळाविषयी विचार होईल, असेही या बैठकीत ठरले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद