शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीची वर्षपूर्ती : डावी आघाडी उतरली रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:45 IST

नोटाबंदी, फसवी कर्जमाफी, पेट्रोल- डिझेलचे वाढलेले भाव, विविध समाजाच्या आरक्षणाकडे शासनाने केलेले दुर्लक्ष या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जनआक्रोश आंदोलन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नोटाबंदी, फसवी कर्जमाफी, पेट्रोल- डिझेलचे वाढलेले भाव, विविध समाजाच्या आरक्षणाकडे शासनाने केलेले दुर्लक्ष या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जनआक्रोश आंदोलन केले़नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ.डी.पी.सावंत, महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले.शासनाविरोधात तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाहतूक पोलिसांनी इतर रस्त्याने वळविली. यावेळी आ.डी.पी. सावंत, आ.अमरनाथ राजूरकर, आ.वसंतराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आ. रोहिदास चव्हाण, सुमती व्याहाळकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, नामदेवराव केशवे यांच्यासह अनेक वक्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी भूमिकेवर कडाडून हल्ला चढविला.शेतकºयांची फसवी कर्जमाफी, धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने केलेले दुर्लक्ष, जीएसटी, नोटाबंदीचे झालेले दुष्परिणाम यामुळे सामान्य जनता हैराण झाल्याचे सांगण्यात आले.आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर शीलाताई भवरे, माजी आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर, बी. आर. कदम, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, रोहिदास चव्हाण, रावसाहेब अंतापूरकर, माधवराव पा. जवळगावकर, दिलीप पा.बेटमोगरेकर, शैलजा स्वामी, उपमहापौर विनय गिरडे, आनंदराव चव्हाण, मसूद अहेमद खान, माधवराव मिसाळे, शीला निखाते, प्रकाश भोसीकर, मंगलाताई धुळेकर, मंगलाताई निमकर, अनिताताई हिंगोले, सुमती व्याहाळकर, शमीम अब्दुला, गंगाधर सोंडारे, कविता कळसकर, प्रा. किशनराव किनवटकर, बलवंतसिंघ गाडीवाले, विरेंद्र्रसिंघ गाडीवाले, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, कोषाध्यक्ष विजय येवनकर, संतोष पांडागळे, राजन देशपांडे, बाळासाहेब देशमुख बारडकर, किशोर स्वामी, भगींदरसिंग घडीसाज, रवींद्र्रसिंघ बुंगई, मारोती पटाईत, गिरीधर डाके, डॉ.एन. के. सरोदे, श्रीकांत गुंजकर, नारायण श्रीमनवार, उमाकांत पवार, डॉ.विश्वास कदम, आनंदराव गुंडले, नारायण कोलंबीकर, आनंद भंडारे, शेषराव चव्हाण, भगवान दंडवे, भीमराव कल्याणे आदींचा सहभाग होता़