शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अंजता, राज्यराणी, देवगिरी एक्स्प्रेस पुन्हा धावणार

By | Updated: December 2, 2020 04:05 IST

औरंगाबाद : अंजता एक्स्प्रेस १ डिसेंबर, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस ३ डिसेंबर, तर देवगिरी एक्स्प्रेस ५ डिसेंबरपासून धावणार आहे, ...

औरंगाबाद : अंजता एक्स्प्रेस १ डिसेंबर, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस ३ डिसेंबर, तर देवगिरी एक्स्प्रेस ५ डिसेंबरपासून धावणार आहे, अशी माहिती ‘दमरे’च्या नांदेड विभागाने दिली. या ३ रेल्वेमुळे प्रवाशांची सुविधा होणार आहे.

सिकंदराबाद – मनमाड अजंता विशेष रेल्वे १ डिसेंबर रोजी सिकंदराबादहून सायंकाळी ६.५० वाजता सुटेल. औरंगाबादेत ही रेल्वे सकाळी ५.३० वाजता येईल आणि ५.४० वाजता रवाना होऊन मनमाड येथे सकाळी ८.०५ वाजता पोहोचेल. मनमाड - सिकंदराबाद अजंता विशेष रेल्वे २ डिसेंबर रोजी मनमाडहून रात्री ८.५० वाजता सुटेल. औरंगाबादला रात्री १०.४० येईल आणि १०.४५ वाजता पुढे रवाना होईल.

नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष रेल्वे ३ डिसेंबर रोजी नांदेडहून रात्री १० वाजता परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी १०.०७ वाजता पोहोचेल.

मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष रेल्वे ४ डिसेंबर रोजी मुंबई सीएसटी रेल्वेस्थानकावरून सायंकाळी ६.४५ वाजता सुटून मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणीमार्गे हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी ७.२० वाजता पोहोचेल. या रेल्वेला १७ बोगी असतील. सिकंदराबाद-नांदेड-मुंबई देवगिरी विशेष रेल्वे ५ डिसेंबर रोजी सिकंदराबादहून दुपारी १.२५ वाजता सुटून नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाडमार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी ७.१० वाजता पोहोचेल. मुंबई-नांदेड-सिकंदराबाद देवगिरी विशेष रेल्वे ६ डिसेंबर रोजी सीएसटी मुंबई रेल्वेस्थानकावरून रात्री ९.३० वाजता सुटून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे सिकंदराबाद येथे दुपारी २.४० वाजता पोहोचेल.

या रेल्वेला २१ बोगी असतील.

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या बोगीत वाढ

नंदीग्राम विशेष एक्स्प्रेसमध्ये तीन अधिकच्या बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली.