घोसला : सोयगाव तालुक्यातील मोठ्या धरणांची पाणी पातळी कमी झाली असून अनेक ठिकाणचे पाझर तलाव आटल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात जनावरांना देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांना पाणीच मिळत नसल्याने पाण्यासाठी तहान क्षमविण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे विदारक चित्र घोसला शिवारात दिसून आले आहे.
सोयगाव तालुक्यातील प्रमुख अकरा धरणे मृत साठ्यावर आलेली आहेत. त्यासोबतच पाझर तलाव तर कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे जंगलात पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य निर्माण झालेली आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धरणांनी मृत साठा गाठला. त्यामुळे जनावरांना घोटभर पाण्यासाठी पाच ते सात किलोमीटर पायपीट करून घेऊन जावे लागत आहे.
सत्तर हजार जनावरांचा प्रश्न गंभीर
तालुक्यात ७०,३५८ लहान- मोठे पाळीव प्राण्यांची संख्या आहे. या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून जनावरांच्या पाणीटंचाईवर उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्याशिवाय जनावरांचे दुर्भिक्ष्य थांबणार नाही.
छायाचित्र : सोयगाव-पिण्याच्या पाण्यासाठी कवली ते बहुलखेडा दोन गावांतून जनावरांची पायपीट.
230521\dnyneshwarwagh151278-0558285828_1.jpg
पाण्यासाठी जनावरांना वणवण घेऊन जावे लागत आहे.