शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातून चारा वाहतुकीला बंदी; दुष्काळात जनावरांना जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:27 IST

प्रशासनाने चाऱ्याच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. 

ठळक मुद्दे१० लाख ६७ हजार जनावरांना जगविण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हानजिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या 

औरंगाबाद : जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत गंभीर दुष्काळ असल्याचे शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर केले आहे. त्यामुळे जून २०१९ अखेरपर्यंत नऊ तालुक्यांतील पशुधन जगविण्यासाठी चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत प्रशासनाने चाऱ्याच्या वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. 

जिल्ह्यात सरासरीच्या ५३ टक्के पर्जन्यमान झाले. त्यामुळे सर्व तालुक्यांत गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात चाराटंचाई भासण्याची शक्यता आहे. येथील उत्पादित चारा पशुधनाला पुरावा या दृष्टीने जिल्ह्यातून परजिल्ह्यात अथवा परराज्यात चारा वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे जनावरांना चारा न मिळाल्यास चाऱ्याची पळवा-पळवी होऊ शकते. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ३० जून २०१९ पर्यंत चारा वाहतूक बंदी करण्यात आली आहे. 

२३६ दिवस पुरेल इतकाच चारा जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ११८ लहान जनावरे आहेत. ५ लाख ८ हजार ३२ मोठी जनावरे आहेत. शेळी व मेंढी ३ लाख ९१ हजार २३२ आहेत. १० लाख ६७ हजार ४१२ इतके सर्व पशुधन आहे. ३ हजार ७८७ मेट्रिक टन इतका चारा या पशुधनाला रोज लागतो. सध्या ८ लाख ९४ हजार ६३६ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. २३६ दिवस हा चारा जिल्ह्यातील पशुधनाला पुरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. १० लाख २२ हजार ६१६ मेट्रिक टन चारा जून २०१९ पर्यंत लागणार आहे. १ लाख २७ हजार ९८२ मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा जाणवेल. चारा उपलब्ध करण्याचे प्रशासनासमोर आव्हान असेल.