शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

...आणि जुळले सतरा संसार

By admin | Updated: July 10, 2016 01:04 IST

औरंगाबाद : येथील कौटुंबिक न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये ७७.१४ टक्के प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली.

औरंगाबाद : येथील कौटुंबिक न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये ७७.१४ टक्के प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली. लोकअदालतचे अनौपचारिक उद्घाटन कौटुंबिक न्यायालयाच्या प्रभारी प्रमुख न्यायाधीश अनघा जोशी यांनी केले. कौटुंबिक न्यायालयात एकूण ५८ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. उभयपक्षाचे ३५ जोडपी सुनावणीसाठी हजर राहिले. एकूण २७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यापैकी १७ प्रकरणांमधील जोडपी नांदायला गेली. २२ प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर होते. आजच्या लोकअदालतमध्ये पॅनल क्रमांक १ मध्ये निवृत्तप्रमुख न्यायाधीश डी.पी. खोत यांनी प्रमुख पंच म्हणून तर विवाह समुपदेशक कुंदन जाधव आणि अ‍ॅड. जे.एस. देशपांडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच पॅनल क्रमांक २ मध्ये निवृत्त न्यायाधीश के. के. गायकवाड प्रमुख पंच म्हणून तर विवाह समुपदेशक एम.एस. कदम आणि अ‍ॅड. ए. डी. करडखेडकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. महालोकअदालतच्या यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालयातील न्यायालयीन अधीक्षिका चित्रा पाटोळे, कर्मचारी रजनी कुलकर्णी, आशा बागूल, मंगेश गव्हाणे, सुरेखा दाणी, सतीश चेडे, प्रल्हाद कुदळे आणि अमोल खोत यांनी परिश्रम घेतले.