औरंगाबाद : सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. एन. धनागरे हे यंदा अनंत भालेराव स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. अनंत भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे व सचिव डॉ. सविता पानट यांनी ही घोषणा केली. मुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस न्या. नरेंद्र चपळगावकर, प्रा. सुधीर रसाळ, सुभाषचंद्र वाघोलीकर, प्रा. विजय दिवाण, बी.एन. राठी, संजीव कुलकर्णी, सुमती धारवाडकर, डॉ. प्रभाकर पानट यांची उपस्थिती होती. डॉ. धनागरे यांना ९ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याप्रसंगी भारतातील शिक्षणव्यवस्थेच्या प्रश्नांवर डॉ. धनागरे यांचे व्याख्यान होणारआहे. धनागरे यांनी प्रदीर्घकाळ पुणे विद्यापीठ, कानपूर आयआयटी व इतर संस्थांमध्ये समाजशास्त्राचे अध्यापन केले आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणूनही त्यांनी प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे.
धनागरे यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार
By admin | Updated: October 17, 2014 23:57 IST