शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

अमोल खरातने ४७ चेंडूंत ठोकल्या नाबाद १0४ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:44 IST

गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी २0 क्रिकेट स्पर्धेत आकाश खरातने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या बळावर आयआयए औरंगाबाद संघाने अशक्यप्राय आव्हानही यशस्वीपणे पेलताना शानदार एमसीए संघावर विजय मिळवला.

ठळक मुद्देऔद्योगिक स्पर्धा : आयआयए, एमआर इलेव्हन संघ विजयी

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी २0 क्रिकेट स्पर्धेत आकाश खरातने केलेल्या वादळी शतकी खेळीच्या बळावर आयआयए औरंगाबाद संघाने अशक्यप्राय आव्हानही यशस्वीपणे पेलताना शानदार एमसीए संघावर विजय मिळवला. अन्य लढतीत एमआर इलेव्हन संघाने मेघा इलेक्ट्रिकल्स संघावर मात केली.सकाळच्या सत्रात एमआर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकांत सर्वबाद १३२ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश नायरने ३७ चेंडूंत २ चौकार, एका षटकारासह ३९ व विजय ढेकळे याने १८ चेंडूंत २ षटकार व एका चौकारासह २७ धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघाकडून आदित्य करडखेडकरने ३0 धावांत ५ गडी बाद केले. चरण राजपूतने ३ व सुनील जोशीने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात मेघना इलेक्ट्रिकल संघ ५५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अशोक शिंदेने १४ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून सिराज काझीने ५ धावांत ३ व सय्यद जलीसने २ गडी बाद केले. विजय ढेकळे, सईद फिरदोस व व्यंकटेश सोनवलकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसºया सामन्यात एमसीए संघाने २0 षटकांत ३ बाद १८0 धावा केल्या. त्यांच्याकडून शोएब अहमदने ५८ चेंडूंत १२ चौकार, एका षटकारासह ८८ व सय्यद शुजा याने ५६ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ७३ धावा केल्या. आयआयए संघाकडून अमोल खरात व समीर यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एमसीए संघाने विजयासाठी दिलेले १८१ धावांचे लक्ष्य अमोल खरात याने केलेल्या चौफेर टोलेबाजीच्या बळावर आयआयए संघाने १७.३ षटकांत फक्त ३ फलंदाज गमावून साध्य केले. अमोल खरातने अवघ्या ४७ चेंडूंतच १६ खणखणीत चौकार आणि २ टोलेजंग षटकारासह नाबाद १0४ धावांचा पाऊस पाडला. मिर्झा मसूदने ३४ व अजय राजपूतने १४ धावा केल्या. एमसीए संघाकडून रईस अहमद, राम प्रधान व शोएब अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.