शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

अमित पाठकने ३९ चेंडूंत पाडला १0९ धावांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:56 AM

एमजीएम येथे सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत अमित पाठक याने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर एमजीएम संघाने आयुर्विमा संघावर तब्बल १५८ धावांनी विजय मिळवला. अन्य लढतींत वैद्यकीय प्रतिनिधी संघाने कम्बाईन बँकर्स संघावर २१ धावांनी, तर बडवे इंजिनिअरिंगने एमआयटी रुग्णालय संघावर ८ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात शतकवीर अमित पाठक, वीरल पटेल आणि संकेत शर्मा हे सामनावीर ठरले.

ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : एमजीएम, वैद्यकीय प्रतिनिधी संघ विजयी

औरंगाबाद : एमजीएम येथे सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत अमित पाठक याने केलेल्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर एमजीएम संघाने आयुर्विमा संघावर तब्बल १५८ धावांनी विजय मिळवला. अन्य लढतींत वैद्यकीय प्रतिनिधी संघाने कम्बाईन बँकर्स संघावर २१ धावांनी, तर बडवे इंजिनिअरिंगने एमआयटी रुग्णालय संघावर ८ गडी राखून मात केली. आज झालेल्या सामन्यात शतकवीर अमित पाठक, वीरल पटेल आणि संकेत शर्मा हे सामनावीर ठरले.

पहिल्या सामन्यात ३९ चेंडूंतच ११ उत्तुंग षटकार व ८ चौकारांसह १0९ धावांचा पाऊस पाडणाऱ्या अमित पाठक याच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर एमजीएमने आयुर्विमा संघाविरुद्ध २0 षटकांत ४ बाद २४४ धावांचा एव्हरेस्ट रचला. चौफेर टोलेबाजी करणाºया अमित पाठकने अमरदीप असोलकर याच्या साथीने ५५ चेंडूंत १३४ धावांची झंझावाती भागीदारी केली. अमरदीपने ३६ चेंडूंत ८ चौकारांसह ४३ धावा केल्या. मयूर जंगलेने ३१ धावांचे योगदान दिले. आयुर्विमा संघाकडून नंदू सोनवणे, शाम लहाने, विवेक पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आयुर्विमा संघ १४.३ षटकांत ८६ धावांत गारद झाला. फलंदाजीत स्फोटक खेळी करणाºया अमित पाठकने ७ धावांत ४ व अब्दुल समी याने १९ धावांत ३ गडी बाद केले.दुसºया सामन्यात एमआयटी रुग्णालयाने २0 षटकांत ५ बाद १४३ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून संजय क्षीरसागरने ५५ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह नाबाद ६५ धावा केल्या. धीरज जाधवने २८ धावा केल्या. बडवे इंजिनिअरिंगकडून राहुल पाटीलने १८ धावांत २, तर वीरल पटेल व इंद्रजित उढाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात बडवे इंजिनिअरिंग संघाने विजयी लक्ष्य १६.३ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून वीरल पटेलने ५ चौकारांसह ३७, इंद्रजित उढाणने ५ चौकारांसह ३६ व कर्णधार ज्योतिबा विभुतेने २0 चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ३२ धावा केल्या. राहुल पाटीलने ३ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. एमआयटीकडून रोहन शहा व साईनाथ डहाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तिस-या सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाने २0 षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या. त्यांच्याकडून संकेत शर्माने ४३ चेंडूंत ९ चौकारांसह ५७, लईक अन्सारीने १९ धावा केल्या. बँकर्सकडून महेश बोरुडे व दीपक पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात कम्बाईन बँकर्स २0 षटकांत ६ बाद १४७ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून दीपक पाटीलने ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. प्रवीण चौहानने २२, निखिल मुरूमकरने नाबाद २१ धावा केल्या. वैद्यकीय प्रतिनिधी ब संघाकडून जितेंद्र गंगवाल व असद अली यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. २३ मार्च रोजी सकाळी ७.३0 वाजता असियन रुग्णालय वि. एमआयटी, सकाळी १0.३0 वा. एमजीएम ब वि. परिवहन महामंडळ, दु. २.१५ वा. ग्रामीण पोलीस वि. राज्य वस्तू सेवाकर यांच्यात सामने रंगणार आहेत.