लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या न्यायालय आदेशामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाºयांची मोठी कोंडी झाली आहे. तीन दिवसांपासून ती कोंडी फोडण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन बैठकांत गुंतले असून, त्यावर निर्णय मात्र होऊ शकलेला नाही.गुरुवारी बैठकांचे सत्र सुरू होते. मुंबईहून आल्यावर महापौर भगवान घडमोडे, सभापती गजानन बारवाल आणि आयुक्त डी.एम.मुगळीकर यांच्यात बैठक झाली. आयुक्तांनी दिवसभर अधिकाºयांच्या बैठका घेतल्या. न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई ताबडतोब सुरू होईल, असे आयुक्तांनी आज पुन्हा स्पष्ट केले.
धार्मिक स्थळांवरून पालिकेची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:54 IST