शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

आंबेडकरी चळवळ भय्यासाहेबांनी गतिमान केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:17 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम भय्यासाहेब आंबेडकर यांनी नेटाने केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले.सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रमात ते ‘भय्यासाहेब आंबेडकर जीवन आणि कर्तृत्व’ या विषयावर बोलत होते. डांगळे म्हणाले की, धर्मांतरापूर्वी चाचपणीची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुलावर टाकली होती. भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चळवळ अधिक गतिमान केली आहे. भय्यासाहेबांचे आंबेडकर भवनातील कार्यदेखील अतिशय नेत्रदीपक आहे. त्यांच्यामुळेच मी स्वत: लेखक, कार्यकर्ता म्हणून पुढे आलो, अशी एक एक कडी अर्जुन डांगळे यांनी भाषणातून उलगडत भय्यासाहेबांनी केलेले समाजासाठीचे योगदान मांडले.प्रा. अविनाश डोळस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाष्यकार सुनील कदम, महेश भारतीय यांची उपस्थिती होती. सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत शिरसाठ यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश सांगितला. रमाई विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पक्षातील चार जण एकत्र म्हणजे मूर्खपणा असून, खºयाअर्थाने एससी/एसटी/ओबीसी, मराठा, परिवर्तनवादी ब्राह्मण असा सामाजिक एकोपा निर्माण झाले पाहिजे, असे मत सुनील कदम यांनी मांडले. पाणीमंत्री असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४३ मध्येच अनेक बाबींचे नियोजन मांडले. त्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रारूपही आहे. कामगार, महिला सक्षमीकरण, स्कील डेव्हल्पमेंटही त्याच वेळेसची मांडणी आहे, असे कदम म्हणाले.‘आंबेडकर भवन इतिहास आणि वर्तमान’ यावर महेश भारतीय म्हणाले, रोहित वेमुलाच्या आईने बौद्ध धम्म येथे स्वीकारल्याने आंबेडकरी चळवळीचे केंद्रच षड्यंत्र करून जातीयवाद्यांनी नष्ट करण्याचे काम रत्नाकर गायकवाड याच्या माध्यमातून केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. शासनाच्या विविध यंत्रणाही त्यात असल्याचा आरोप भारतीय यांनी केला. आनंद चक्रनारायण यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी चंद्रसेन वंजारे, प्रा. रेखा मेश्राम, संघपाल भारसाखळे, बुद्धप्रिय कबीर व संयोजकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.