शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या खरेदीसाठी रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्या; खा. जलील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:37 IST

MP Imtiyaz Jalil's demands Allow shops to open in the last week of Ramadan नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी देण्याची मागणी. 

औरंगाबाद : मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असलेल्या रमजानच्या शेवटच्या आठवड्यात ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खा. खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची आज भेट घेऊन नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. पुढच्या आठवड्यात शुक्रवारी ( दि. १४ ) रमजान ईद आहे. यावेळी मुस्लीम बांधवांना वेगवेगळी खरेदी करायची असते. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहेत. औरंगाबादसह इतर ठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांस ईदसाठीचे अत्यावश्यक सामान खरेदी करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. शिवाय काही छोटेमोठे व्यापारी वर्षभरात या महिन्यात मोठा व्यापार करतात. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. यामुळे ईदच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन या काळात नियम आणि अटी घालून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. 

ईदनिमित्त होते मोठी उलाढालया वर्षी रमजानचा महिना १२ एप्रिल (बुधवार) पासून सुरु झाला आहे. मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महिनाभरानंतर सर्व बांधव ईदची मोठ्या उत्साहात साजरी करतात. या काळात विविध खरेदी केली जाते. यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. अनेक छोटेमोठे व्यापारी तर या काळात वर्षभराची उलाढाल करतात. मात्र, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे.   

व्यापारी महासंघाने मागितली चार दिवसांची परवानगीमान्सूनपूर्व काम करण्यासाठी चार दिवस सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच सकाळी ११ ऐवजी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली आहे. तसेच  लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी  व्यापाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद