शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

सेटलमेंटसाठी परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:28 IST

जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत स्वतंत्रपणे टाकण्यात येणाऱ्या ‘समांतर’ जलवाहिनीची नवी निविदा काढण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याचबरोबर समांतर जलवाहिनीचे काम सोडून दिलेल्या कंपनीने १३५ कोटी रुपयांची मागणी केली असून याबाबत ‘सेटलमेंट’ करण्याचीही परवानगी महापौरांनी मागितली आहे.

ठळक मुद्देमहापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : ‘समांतर’ची नवी निविदा काढण्यासाठी शासनमंजुरी हवी

१५ कोटींची मागणीउन्हाळ्यापूर्वी शहरात पाणीपुरवठा योजनेत काही महत्त्वाची कामे करायची आहेत. त्यासाठी राज्य शासनाने आपतकालीन योजनेतून १५ कोटींचे अनुदान द्यावे, अशी स्वतंत्र मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.औरंगाबाद : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत स्वतंत्रपणे टाकण्यात येणाऱ्या ‘समांतर’ जलवाहिनीची नवी निविदा काढण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याचबरोबर समांतर जलवाहिनीचे काम सोडून दिलेल्या कंपनीने १३५ कोटी रुपयांची मागणी केली असून याबाबत ‘सेटलमेंट’ करण्याचीही परवानगी महापौरांनी मागितली आहे.योजना पूर्ण करण्यासाठी ६६० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, मनपा प्रशासनही या आशयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.समांतर जलवाहिनीच्या कंपनीने महापालिकेला २१ जानेवारी रोजी पत्र पाठविले. या योजनेत कंपनीने मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचे पत्रात नमूद केले आहे. कंपनीतील अंतर्गत भागीदार बदलण्याची परवानगी महापालिका देऊ शकत नसेल, तर या प्रकल्पातून आम्ही बाहेर पडण्यास तयार आहोत. ७९ कोटींची बँक गॅरंटी आणि १३५ कोटी रुपये योजनेतून बाहेर पडण्याचा मोबदला द्यावा, अशी कंपनीची मागणी आहे.मुख्यमंत्री रविवारी औरंगाबादेत आले होते. यावेळी महापौर घोडेले यांनी त्यांची भेट घेऊन समांतरप्रकरणी निवेदन सादर केले. कंपनीने परत काम सुरू करावे यादृष्टीने मनपाने सर्व प्रयत्न केले. कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. कंपनीच्या जाचक अटी मान्य करणे मनपाला कदापि शक्य नाही. त्यामुळे कंपनीला आर्थिक मोबदला देऊन नव्याने निविदा काढण्यास परवानगी द्यावी. मनपाच्या तिजोरीत समांतरचे अनुदान पडून आहे. ही रक्कम ३६० कोटी असून, कंपनीला यातून १३५ कोटी रुपये दिल्यानंतरही २२५ कोटी रुपये शिल्लक राहतात. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी किमान ५६० कोटींचा खर्च येईल. शहरातील विविध कामे, जलकुंभ बांधण्यासाठी साधारणपणे १०० कोटी रुपये लागतील. ६६० कोटींमध्ये शहराची तहान भागेल, असे महापौरांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. राज्य शासनाला या योजनेत ४६५ कोटींचे अनुदान द्यावे लागेल, असा प्राथमिक अंदाजही वर्तविण्यात आला आहे. मनपा आयुक्तही लवकरच यासंदर्भात त्यांच्या अभिप्रायासह मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस