लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) शेंद्रा आॅरिक सिटीमधील दुसºया टप्प्यातील भूखंड वाटप प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४९ पैकी २४ भूखंड वाटप करण्यात आले. त्यावेळी ३२० रुपये प्रति चौरस फूट भाव लावण्यात आला होता. प्रति चौरस मीटर ३२०० रुपयांचा भाव एआयटीएलने आॅरिक सिटीमधील भूखंडासाठी निश्चित केला होता. दुसºया टप्प्यातील भाव, भूखंड आकार याबाबत अजून काही धोरण ठरलेले नाही. दोन दिवसांत त्याबाबतची प्रक्रिया सुरू होणे शक्य आहे. पहिल्या टप्प्यात ४३ एकरांवरील भूखंड विक्रीसाठी खुले करण्यात आले होते. दुसºया टप्प्यात ५७ एकरांवरील भूखंड विक्रीस प्रारंभ होण्याची शक्यता आहे.४३ एकरांमध्ये ४९ प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. त्यात सात गुंठे ते तीन एकर असे टप्पे होते. भूखंड वाटप करताना लीजअॅग्रिमेंट करण्यात आले. शिवाय मूल्यमापन करूनच उद्योगांना भूखंड दिल्याचा दावा डीएमआयसी सूत्रांनी केला आहे. सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध करून देत प्रक्रिया आॅनलाइन राबविली गेली. शेंद्रा डीएमआयसीमध्ये दहा हजार एकर जमीन संपादन करण्यात आली असून, यावर औरंगाबाद इंडस्ट्रियल पार्क (आॅरिक) उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (एआयटीएल) ही कंपनी स्थापन करण्यात आली. बिडकीन इंडस्ट्रियल पार्क सुविधा विकसित करण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीला काम दिले आहे. त्याचेही भूमिपूजन लवकरच होणार आहे.
आॅरिकमधील दुसºया टप्प्यातील भूखंड वाटपाला लवकरच सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:35 IST