शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

जिल्हा परिषदेत निधीचे समान वाटप होणार

By admin | Updated: September 12, 2014 00:06 IST

नांदेड : जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीचे व सेस निधीचे समान वाटप करण्याची घोषणा

नांदेड : जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या १३ व्या वित्त आयोगाच्या निधीचे व सेस निधीचे समान वाटप करण्याची घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची सभा असल्याने सदस्यांना मान देत अध्यक्षांनी शेवटी तरी समान निधी वाटप करावा अशी मागणी उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी केली होती़ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरूवारी झालेली सर्वसाधारण सभा ही विद्यमान पदाधिकाऱ्यांसाठी शेवटची अर्थात निरोपाची सभा होती़ यावेळी झालेल्या विविध विभागांच्या आढाव्यात सदस्यांनी काही वेळा अधिकाऱ्यांना धारेवर धरले असले तरी शेवटच्या सभेत निरोपाचीच भाषणे सदस्यांनी केली़ बांधकाम विभागाची माहिती देताना दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही़ जी़ देशमुख यांना गट ब कार्यक्रमांतर्गत एकूण कामांची माहिती विचारली असता त्यांना ती सभागृहात सादर करता न आल्याने सदस्यांनी त्यांना धारेवर धरले़ तर उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ तायडे यांची अनुपस्थितीही सदस्यांच्या संतापाचे कारण ठरले़ कार्यकारी अभियंता पदाच्या चार दिवसांच्या काळात उपअभियंता वहाब यांनी दिलेल्या देयकांची चौकशी झाली नसल्याने नागोराव इंगोले, रमेश सरोदे, मोहन पाटील टाकळीकर यांनी प्रशासन काय करते असा सवाल केला़ समाजकल्याण विभागाच्या विषयात अडीच वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या नसल्याबद्दल डॉ़ मिनाक्षी कागडे, दिनकर दहिफळे आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ अध्यक्ष बेटमोगरेकर यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे, आरोग्य व अर्थ सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, समाजकल्याण सभापती मंगाराणी अंबुलगेकर व महिला, बालकल्याण समिती सभापती कौशल्याताई तमशेट्टे यांची ही पदाधिकारी म्हणून अखेरची सभा ठरली़ त्यांच्याबद्दलही सभागृहात अनेक सदस्यांनी विचार व्यक्त केले़ त्यात रोहिदास जाधव, नागोराव इंगोले, श्रीनिवास मोरे, मारोतराव कवळे, दशरथ लोहबंदे, पुरूषोत्तम धोंडगे, वर्षाताई भोसीकर, रमेश सरोदे, गंगाधर तोटलोड, रमेश घंटलवाड, अशोक पाटील, डॉ़ मिनाक्षी कागडे यांनी विचार व्यक्त केले़ त्यात अध्यक्ष बेटमोगरेकर यांच्या कार्यशैलीबद्दल चांगले मत व्यक्त करताना विरोधकांना विश्वासात न घेणे, संघर्षमय काळ, ‘तळे राखताना पाणी चाखले’ यासह विरोधकांना गोल कसे करावे हे कसब त्यांना चांगले अवगत असल्याचाही उल्लेख करण्यात आला़ अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी अडीच वर्षातील चांगले-वाईट अनुभव कथन केले़ निवडून आलेल्या भागासाठी निधी नेणे हे प्रत्येक सदस्याचे काम आहे़ यात पदाधिकाऱ्यांकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगितले़ येणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडूनही त्या राहतील़ त्यावेळी आपल्या भूमिकेचे ते समर्थन करतील असेही ते म्हणाले़ सदस्यांशी झालेले वाद हे वैयक्तिक स्वरूपाचे नव्हते तर सार्वजनिक हितातून निर्माण झाले होते़ ते तत्कालीक होते असेही त्यांनी स्पष्ट केले़ आपल्यावर जादा निधी नेल्याचा आरोप झाला असला तरी इतर पदाधिकाऱ्यांनीही निधी नेल्याचे सांगतांना बेटमोगरेकर यांनी बांधकाम व शिक्षण सभापती कऱ्हाळे यांचा उल्लेख केला़ अध्यक्षांच्या खालोखाल जर निधी कुणी नेला असेल तर तो कऱ्हाळे यांनी नेला असे ते म्हणाले़ सभागृहाच्या भावना लक्षात घेवून १३ व्या वित्त आयोग व सेस निधीचे समान वाटप होईल अशी घोषणाही त्यांनी केली़ यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी गुलाब राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, वित्त अधिकारी बैनवाड यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी) शिक्षण विभागातील वादग्रस्त १४७६ या आऊटवर्ड क्रमांकाद्वारे दिलेल्या बदल्यांच्या आदेशाबाबतही सभागृहात शिवसेनेचे इंगोले यांनी प्रश्न उपस्थित केला़ त्यावेळी सदर बदल्यांची संचिका आणि सर्व कागदपत्रे असल्याचा खुलासा अध्यक्ष बेटमोगरेकर यांनी करताना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आपणही केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले़ प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नाही़ निमशिक्षकांना नियुक्ती देताना १ जूनपासूनचे नियुक्ती आदेश दिले आहेत़ ते १ मार्चपासून देण्यात यावेत असे आदेशही शिक्षण विभागाला देण्यात आले़