लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी आयोजित इफ्तार पार्टीस शहरातील सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, माजी नगराध्यक्ष राजेश देशमुख तळेगावकर, पंचायत समितीचे सभापती शिरीषराव देशमुख गोरठेकर, कैलासराव गोरठेकर , माजी नगराध्यक्ष प्रवीण सारडा, उमरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष रफीक कुरेशी, धर्माबादचे उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, सदानंद खांडरे, माजी नगरसेवक एजाज खान, मशीद कमिटीचे अध्यक्ष सय्यद फारुख, संजीव सवई, सय्यद रशीद, जावेद खान, इलियास पठाण, बाजार समितीचे संचालक धीरज दर्डा, प्रभाकर पुयड, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड, सपोनि फारुख खान, माजी नगरसेवक अब्दुल लतीफ, उपनिरीक्षक शहदेव खेडकर, ज्ञानेश्वर शिंदे हाजी सज्जन सेठ, हाजी तजमुल सेठ, शेख इमरान, बाळू शिंदे, साईनाथ जमदाडे, नंदू डहाळे, बाबू बेग, रतन खंदारे, ईरबा शेळके, माजी नगरसेवक रामराव मुदिराज, अहेमद बेग, जमील भाई मेकॅनिक, जाकीर खान, हाजी तखीउल्ला बेग, सिकंदर पठाण, नवाज बेग, निजाम तांबोळी, गजानन खांडरे, शाहीनसेठ, रशीद भाई, नन्हेसाब फुलवाले, शेख इम्रान, हाजी सत्तार सेठ कुरेशी, डॉक्टर शाहीन कुरेशी उपस्थित होते. उमरी मशीद कमिटीच्या वतीने बापूसाहेब देशमुख गोरठेकर व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील नागरिक, कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.
उमरीतील इफ्तार पार्टीत सर्वधर्मीयांचा सहभाग
By admin | Updated: June 24, 2017 23:48 IST