शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पुतळा दहनासाठी चिथावणीचा आरोप

By admin | Updated: June 29, 2014 00:22 IST

वसमत : येथे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारी तालुक्यातील असंख्य शिवसैनिक वसमत येथे दाखल झाले.

वसमत : येथे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारी तालुक्यातील असंख्य शिवसैनिक वसमत येथे दाखल झाले. त्यांनी पुतळा दहन करणाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदविला व या प्रकारास संपर्कप्रमुख सुहास सांमत यांनीच चिथावणी दिली असल्याचा आरोप बैठकीत केला. त्यावर डॉ. मुंदडा यांनी संतप्त सेना कार्यकर्त्यांना शांत करून पक्षातील गटबाजीला थारा देऊ नये, असे आवाहन केले. वसमत येथे शुक्रवारी शिवसेनेची बैठक संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती. बैठकीनंतर सेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन काही कार्यकर्त्यांनी केल्याने खळबळ उडाली. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजीचा सूर उमटला. या घटनेचा निषेध करण्यासाठी वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात तालुक्यातील शिवसैनिकांची शनिवारी बैठक झाली. बैठकीस माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, उपजिल्हा प्रमुख सुनील काळे, जि.प.चे शिक्षण सभापती रंगराव कदम, राजेश मुसळे, नारायण सवंडकर, अंकुश आहेर, बालाजी तांबोळी, बालाजी यशवंते, संभाजी बेले, राजेश पवार, दौलतराव आहेर, शिवाजी शिंदे, तान्हाजी कदम, रमेश स्वामी, दीपक हळवे, राजेश भोसले, डॉ. गोविंद ईपकलवार, योगेश चेपूरवार, काशीनाथ भोसले, रामकिशन झुंझुर्डे, कन्हैैय्या बाहेती, आनंद बडवणे, नागनाथ स्वामी, शिवदास बोड्डेवार, पंडीतराव डोणे, भास्कर चट्टे, नरेंद्र कमळू, माऊली झटे, मुंजाजी इंगोले यांच्यासह जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख व मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते हजर होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी पक्षात गटबाजी करणाऱ्यांनी कुभांड रचून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले. वसमतमधील सर्व शिवसैनिक एकत्रपणे विधानसभेवर भगवा फडकवतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री डॉ.मुंदडा यांनी कार्यकर्त्यांनी चिथावणीला बळी पडू नये, पक्षात गटबाजी करणाऱ्यांना थारा देऊ नये, असे आवाहन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न विधानसभेवर भगवा फडकविण्याचा आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना ज्या मतदारसंघात मताधिक्य मिळालेले नाही. हदगावमध्ये ते लीड मिळवू शकले नाहीत. किनवट, उमरखेडमध्ये लीड नाही, तेथे जावून पराभवाची कारणे शोधण्याऐवजी वसमत येथे येऊन गटबाजी करणे योग्य नसल्याचा टोलाही डॉ. मुंदडा यांनी लगावला. एकंदरीत शिवसेनेतील गटबाजी विधानसभेच्या तोंडावर उफाळून आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)