जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची आढावा बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, अभियानाचे व्यवस्थापक दिलीपसिंग बयास, प्रवीण पिंजरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. आर. पाटील आदींसह सर्व यंत्रणांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ओबीसी महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्या
औरंगाबाद: ओबीसी महामंडळाकडून थकीत व्याजदरात २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. म्हणजेच, ज्या लाभार्थींना दीर्घ मुदती योजना, बीजभांडवल योजना व मार्जिन मनी योजनांमध्ये कर्ज देण्यात आले अशा व्यक्तींनी थकित व्याजाच्या रकमेत ३३.३३ टक्के सूट देण्यात येईल. सदर योजना मर्यादित कालावधीकरिता आहे. या एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.