शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शहरातील १५ लाख लोकांच्या जीवनाशी निगडित अतिसंवेदनशील विषयांवर शासनाच्या सर्वच विभागांनी त्वरित पावले उचलावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:19 IST

घनकचरा व्यवस्थापनासह, शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे जनहित याचिकांद्वारे खंडपीठाचे लक्ष वेधले असता ‘शहरातील १५ लाख लोकांच्या जीवनाशी निगडित या अतिसंवेदनशील विषयांवर शासनाच्या सर्वच विभागांनी त्वरित पावले उचलावीत, तसेच शपथपत्र दाखल करावे, असे तोंडी निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी गुरुवारी (दि.३१) सुनावणीदरम्यान सर्व संबंधितांना दिले.

ठळक मुद्देखंडपीठाचे शासनासह महापालिका व इतर शासकीय यंत्रणांना तोंडी निर्देश

औरंगाबाद : घनकचरा व्यवस्थापनासह, शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे जनहित याचिकांद्वारे खंडपीठाचे लक्ष वेधले असता ‘शहरातील १५ लाख लोकांच्या जीवनाशी निगडित या अतिसंवेदनशील विषयांवर शासनाच्या सर्वच विभागांनी त्वरित पावले उचलावीत, तसेच शपथपत्र दाखल करावे, असे तोंडी निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. आर.जी. अवचट यांनी गुरुवारी (दि.३१) सुनावणीदरम्यान सर्व संबंधितांना दिले.गेल्या वर्षभरापासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा, पथदिव्यांचा प्रश्न आदी सुमारे बारा महत्त्वाच्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास औरंगाबाद महापालिका अपयशी ठरल्यामुळे ती बरखास्त करावी आणि महापालिकेवर प्रशासकांची नेमणूक करावी, अशी विनंती करणाऱ्या अमोल गंगावणे यांच्या जनहित याचिकेसह इतर विविध विषयांवरील जनहित याचिकांवर गुरुवारी एकत्रित सुनावणी झाली. या सर्व याचिकांवर उद्या शुक्रवारी (दि.१) दुपारी ३.३० वाजता एकत्रित सुनावणी होणार आहे.आजच्या सुनावणीत मनपा आयुक्तांच्या वतीने अ‍ॅड. जयंत शहा यांनी शपथपत्रासाठी वेळ मागून घेतला, तर महापौरांच्या वतीनेही वेळ मागून घेण्यात आला. आज इतर याचिकांच्या अनुषंगाने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी शपथपत्र दाखल केले. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार २३ जानेवारी २०१९ रोजी पी. गोपीनाथ रेड्डी यांना दारोदार कचरा संकलन करुन वाहतूक करण्याच्या कंत्राटाचा कार्यादेश देण्यात आला आहे. त्यावर ‘अद्याप कचरा संकलन का होत नाही’ असा प्रश्न खंडपीठाने विचारला असता अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले की, कंत्राटदाराने नवीन २३० वाहने आणली आहेत. मात्र, आरटीओ कार्यालयाने आठवड्यापासून या वाहनांचे पासिंग केले नाही, म्हणून कचरा संकलन होऊ शकले नाही. खंडपीठाने याबाबत खात्री करण्याचे सहायक सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर यांना सांगितले असता त्यांनी त्वरित संपर्क साधला असता ५० टक्के वाहनांचे पासिंग झाले असून, उर्वरित वाहनांचे पासिंग एक आठवड्यात होईल, असे आरटीओ कार्यालयातून सांगण्यात आल्याचे यावलकर यांनी खंडपीठास सांगितले.हर्सूल येथे दूषित पाणीहर्सूल येथे सार्वजनिक विहिरीलगतच कचरा टाकला जातो. त्यामुळे विहिरीचे पिण्याचे पाणी दूषित झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. यावर खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला ‘त्या’ पाण्याच्या तपासणीचे तोंडी निर्देश दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCourtन्यायालय