अकोला, दि. ६-मलकापूर परिसरातील गायत्री बालकाश्रम येथून ऑगस्ट २0१६ मध्ये पळून गेलेली एक १७ वर्षीय मुलगी सोमवारी औरंगाबाद येथे सापडली. खदान पोलीस गत आठ महिन्यांपासून या मुलीचा शोध घेत होते. तिला सोमवारी अकोल्यात आणून गायत्री बालकाश्रम येथे दाखल करण्यात आले आहे.गायत्री बालकाश्रम येथील १७ वर्षीय मुलगी २१ ऑगस्ट २0१६ रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी खदान पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला; मात्र या मुलीचा शोध पोलिसांना लागला नाही. रविवारी ही मुलगी औरंगाबाद येथील क्रांती चौकात बसस्थानकावर असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली. औरंगाबाद पोलिसांनी तिला औरंगाबाद येथीलच सायली बालकाश्रम येथे ठेवले. खदान पोलीस या मुलीचा शोध घेत असतानाच त्यांनी औरंगाबाद पोलिसांनी सं पर्क साधला असता सदर मुलगी ही सायली बालकाश्रम येथे असल्याचे समोर आले. यावरून खदान पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिला अकोल्यात आणले. त्यानंतर गायत्री बालकाश्रम येथे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.गत आठ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यात आला. तिला गायत्री बालकाश्रम येथे दाखल करण्यात आले. नातेवाइकांनाही माहिती दिली; मात्र सदर मुलीची मन:स्थिती बरोबर नसल्याची माहिती समोर आली. तिला समुपदेशनाची गरज असल्याचे दिसून येत असल्याने या मुलीला आता समुपदेशन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मुलगी पुन्हा पळून जाणार नाही, यासाठी पोलिसांकडून आवश्यक असलेली सर्व सुविधा तिला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- गजानन शेळके, ठाणेदार, खदान पोलीस स्टेशन, अकोला.
अकोल्यातील मुलगी औरंगाबादेत सापडली!
By admin | Updated: February 7, 2017 03:28 IST