शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

नाथ मंदिरातील ‘अजान’ वृक्ष तब्बल १० वर्षांनंतर ‘फुल’ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:59 IST

भूतलावरील वृक्षवल्ली औषधी गुणधर्मयुक्त असल्याचे सर्वज्ञात आहे. याचप्रमाणे अध्यात्मास पोषक अशा दैवी गुणांनी संपन्न असलेल्या मोजक्या वृक्षांना देववृक्ष म्हणून संबोधले जाते. अशा देववृक्षाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. अशाच देववृक्षांपैकी एक असलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातील ‘अजान’ वृक्षास यंदा पुन्हा १० वर्षांनंतर फुले आल्याने वारकरी संप्रदाय व भाविकांमध्ये कुतुहल आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी २००८ मध्ये या वृक्षास फुले आली होती. यंदा नाथांच्या दर्शनासोबतच या देववृक्षाच्या दर्शनाचाही दुहेरी लाभ भाविकांना होत आहे.

संजय जाधवपैठण : भूतलावरील वृक्षवल्ली औषधी गुणधर्मयुक्त असल्याचे सर्वज्ञात आहे. याचप्रमाणे अध्यात्मास पोषक अशा दैवी गुणांनी संपन्न असलेल्या मोजक्या वृक्षांना देववृक्ष म्हणून संबोधले जाते. अशा देववृक्षाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. अशाच देववृक्षांपैकी एक असलेल्या संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातील ‘अजान’ वृक्षास यंदा पुन्हा १० वर्षांनंतर फुले आल्याने वारकरी संप्रदाय व भाविकांमध्ये कुतुहल आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी २००८ मध्ये या वृक्षास फुले आली होती. यंदा नाथांच्या दर्शनासोबतच या देववृक्षाच्या दर्शनाचाही दुहेरी लाभ भाविकांना होत आहे.भारतीय संस्कृतीत बिल्ववृक्ष, औदुंबर, वड, तुळस, पिंपळ, अर्जुन इ. वृक्षांना देववृक्ष मानले जाते. तिथी व वारानुसार या वृक्षांची पूजा करण्यात येते. वटवृक्ष व बिल्ववृक्ष यांना मोक्षदायी मानले गेले आहे.अजान वृक्षास वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अजानवृक्ष संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी आपेगाव (ता. पैठण), आळंदी, संत एकनाथ महाराज मंदिर (पैठण) यासह संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अंबाजोगाई व फलटण येथील मंदिरात दिसून येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी या अजानवृक्षास सदैव सोबत ठेवल्याचे दिसते. अजानवृक्षाखाली बसून ध्यान धारणा केल्यास मेंदूत सुधारणा होते. या वृक्षाचे रोज एक पान खाल्ल्यास मनोबल वाढते, असे या वृक्षाचे गाढे अभ्यासक प्रा. कृष्णा गुरव यांनी त्यांच्या लेखातून मांडलेले आहे. आजही नाथ मंदिरात येणारे भाविक या वृक्षास प्रदक्षिणा घालून झाडाचे पान मुखात टाकतात. झाडाची जास्त प्रमाणात पाने तोडली जाऊ नये म्हणून नाथ संस्थानच्या वतीने झाडाची पाने तोडू नये, असा फलक लावलेला आहे.संत एकनाथ महाराजांनी अजानवृक्षाबाबत सांगताना या वृक्षाच्या फळाचे दुधातून सेवन केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते, असे म्हटले आहे.अजानवृक्षाची पाने जाण जो। भक्षून करील अनुष्ठान।।त्यासी साध्य होईल ज्ञान। तेथे संशय नाही।। असेही वचन संत एकनाथ महाराजांनी लिहून ठेवले आहे.संत नामदेव महाराज यांनी तर ‘अजानवृक्ष दंड आरोग्य अपार’ असे लिहून ठेवले आहे.संत वचनाप्रमाणे आजतगायत या वृक्षाखाली बसून अनुष्ठान करणाºया हजारो भाविकांना संतवचनाची प्रचिती आली आहे. या वृक्षाच्या गळून पडलेल्या पानाचे चूर्ण करून सेवन केल्यास शारीरिक विकार नष्ट होतात, असे आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले.अजानवृक्षास किती वर्षांनी फुले येतात, याबाबत मतभिन्नता आहे. काहींच्या मते १० वर्षांनी, काहींच्या मते पाच तर काहींच्या मते शुभ असणाºया कोणत्याही वर्षी अजानवृक्षास फुलांचा बहर येतो.यंदा मात्र या अजानवृक्षास १० वर्षांनंतर फुलांचा बहर आला आहे. अजानवृक्ष फुलांच्या बहराने लगडल्याने शुभसंकेत मानून वारकरी व भाविकात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.चौकट...संत नामदेव महाराज या वृक्षाचे महत्त्व विशद करताना सांगतात,समाधीसुख दिधले देवा।ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा।।अजान वृक्षी बीज वोल्हावा। भक्तजनी।।या चरणाचा भावार्थ असा,संत नामदेव महाराज भगवान विठ्ठलाचे चरण धरून म्हणतात, ‘हे देवा, श्री ज्ञानेशांना समाधीसुख दिलेस, ज्ञानांजन घालणारी माऊली संजीवन समाधी रुपाने अलंकापुरी कायमचा ठेवा झाली आहे. श्री माऊलींनी लावलेला जो अजानवृक्ष आहे, तो माऊली