शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाच्या विमानांनी चुकला काळजाचा ठोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:29 IST

हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहरावरून तीन ते चार घिरट्या मारल्या.

ठळक मुद्देसुखोई-३० : जोरदार आवाजामुळे घाबरून नागरिकांची घराबाहेर धाव

औरंगाबाद : हवाई दलाच्या दोन फायटर प्लेनने शहरावरून गुरुवारी (दि. ११) ८.३० वाजेच्या सुमारास अचानक एकापाठोपाठ वायुवेगाने उड्डाण केल्याने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. विमानांच्या मोठ्या आवाजामुळे कुतूहलयुक्त भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या विमानांनी शहरावरून तीन ते चार घिरट्या मारल्या.शहरात गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक आकाशातून मोठा आवाज येऊ लागल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. तेव्हा थोड्या थोड्या अंतराने एकापाठोपाठ दोन विमाने अतिशय वेगाने जात असल्याचे नागरिकांच्या दृष्टीस पडले. या विमानांनी आकाशात दोन ते तीन घिरट्या मारल्या. विमानांचा आकाशात मोठा आवाज घुमत होता. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली. शहरातील विविध भागांत नागरिक घराबाहेर जमून चर्चा करीत होते. औरंगाबादेत हवाई दलाचे तळ नाही, मग अचानक लढाऊ विमान शहराच्या हद्दीत कसे काय उड्डाण करीत आहेत, काय झाले असावे, अशी चर्चा नागरिकांत सुरू झाली. अनेक जण उत्सुकतेपोटी एकमेकांना फोन करून विचारणा करीत होते. ही दोन्ही विमाने पुण्यावरून आली होती. ही सुखोई-३० विमान असून, त्यांनी रात्री ८ च्या सुमारास पुण्याकडे उड्डाण केले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.घरांना कंपगारखेडा, जवाहर कॉलनी आदींसह शहरावरून विमानाचे उड्डाण होत असताना आवाजामुळे घरांना कंप बसल्याचे जाणवले. त्यामुळे तात्काळ घराबाहेर पडलो, असे अनेक नागरिकांनी सांगितले.नियमित सरावहवाई दलाने विमानांच्या लँडिंगसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार त्यांना परवानगी देण्यात आली. नियमित सरावासाठी हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण केल्याचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairforceहवाईदल