लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासन व प्रशिक्षण देणाºया संस्थांमधील तामळमेळाअभावी सलग दुसºया वर्षी जिल्ह्याला घसघशीत उद्दिष्ट मिळूनही त्या प्रमाणात लाभ होताना दिसत नाही. पं.दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्यविकास योजनेत ५२१ जणांना प्रशिक्षण देण्याची संधी असताना केवळ ४0 जणांनाच ती मिळत आहे. तीन संस्थांचे तर अजून कामच सुरू नाही.या उपक्रमासाठी एकूण ५ संस्थांची निवड केली आहे. यात ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट व एज्युकेशन सोसायटीला ७0 जणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट दिले. त्यात हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातून प्रत्येकी १४ जणांना लाभ देणे शक्य आहे. त्यानंतर कॅपस्टन फॅसिलीटीज मॅनेजमेंट प्रा.लि. या संस्थेला ५१ जणांचे प्रशिक्षण दिले. प्रत्येक तालुक्याला १0 चे उद्दिष्ट दिले आहे. नाईस कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटीलाही ५0, ओरियन एज्युटेक प्रा.लि. ३00 तर इंडो जर्मन टूल रुम यांना ५0 जणांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.या योजनेत १८ ते ३५ वयोगटातील युवक व युवतींना प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी व रोजगारनिर्मिती करण्यासाठी हा उपक्रम आहे. मात्र यातील संस्थांच काम करीत नसल्याचे दरवर्षीच समोर येत आहे. जिल्हा ग्रामीण यंत्रणेकडून त्यासाठी प्रयत्न केले जात असले तरीही संस्थांमुळे त्यांना हात टेकावे लागत आहेत. यंदा आतापर्यंत ग्लोबल व कॅपस्टन या दोन संस्थांनी ४0 जणांना प्रशिक्षणासाठी संधी दिली. उर्वरित तीन संस्थांचे तर कामच सुरू नाही.
उद्दिष्ट ५२१ अन् लाभ ४0 जणांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:36 IST