शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहाय्यक मुख्यालयी फिरकेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:21 IST

सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळातील कृषीसहाय्यकासह पर्यवेक्षकही मुख्यालयाकडे आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने शेतकºयांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा : सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळातील कृषीसहाय्यकासह पर्यवेक्षकही मुख्यालयाकडे आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने शेतकºयांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांसाठी विविध योजना राबविल्या जातात. कृषी कार्यालयाच्या वतीने या योजनांचा प्रचार व प्रसारही केला जातो. तसेच शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येते. सेलू तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने चिकलठाणा मंडळामध्ये ४६ गावांसाठी ९ कृषीसहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.४६ गावांसाठी कर्मचाºयांची संख्या अपुरी असली तरी बहुतांश कर्मचारी मुख्यालयाकडे फिरकत नाहीत, असा आरोप शेतकºयांमधून केला जात आहे. सध्या रबी हंगाम सुरू आहे. शेतकºयांसाठी करडई, हरभरा बियाणे उपलब्ध करून दिले जाते. परंतु, कृषी सहाय्यकच मुख्यालयाकडे फिरकत नसल्याने याची माहिती कोणाकडून घ्यावी, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. खरीप हंगामातही पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला होता.या हंगामामध्ये कृषी सहाय्यकाकडून पिकांवर कोणती औषधी फवारावी? याबाबत मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, शेतकºयांची निराशा झाली. दोन पर्यवेक्षकाची नियुक्ती केली असली तरी मंडळ अधिकाºयाचे पद प्रभारी असल्याने प्रभारी अधिकाºयाला दोन-दोन विभागाचा पदभार पाहताना नाकीनऊ येत आहेत.त्यामुळे या कर्मचाºयांवर वचक राहिला नाही. याकडे लक्ष देऊन कर्मचाºयांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.