शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

आंदोलनवार शुक्रवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:51 IST

शंभर कोटींच्या निधीतून करावयाच्या रस्त्यांमध्ये आमच्याही भागातील रस्त्यांचा समावेश करा, या मागणीसाठी आज वॉर्ड क्र. १३ भीमनगर वॉर्डाच्या नगरसेविका आशा निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शंभर कोटींच्या निधीतून करावयाच्या रस्त्यांमध्ये आमच्याही भागातील रस्त्यांचा समावेश करा, या मागणीसाठी आज वॉर्ड क्र. १३ भीमनगर वॉर्डाच्या नगरसेविका आशा निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. तर चार कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेऊन टकलांवर ‘ महापौरांचा निषेध’ अशी अक्षरे कोरली.साहेबराव रोडगे, दयानंद सरतापे, महादेव खरात व मनोहर अंभोरे या कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेतले. मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे, विजय ऊर्फ गुड्डूभाऊ निकाळजे यांच्यासह निर्मला वाघमारे, उषाताई वाढई, पुष्पा वाळके, सुनीता कंकाळ, अ‍ॅड. भावना खोब्रागडे, ललिता गजभिये, विजया शेंडे, रिना गायकवाड, विजया जाधव, कमलबाई अहिरे, यशोदाबाई काळे, सुरेखा लोखंडे, नीता साळवे, सोनाली पवार, कुणाल राऊत, राजेंद्र गवई, एम. एस, राठोड, आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. माऊली मेडिकल नंदनवन कॉलनी ते भीमनगर- भावसिंगपुरा, पडेगाव हनुमान मंदिरपर्यंतचा हा डीपी रोड चांगल्याप्रकारे बनला पाहिजे.शासनास पाठविण्या येणाºया यादीत वरील रस्त्यांचा समावेश करावा अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनतर्फे (आरएसएफ) प्रशासकीय इमारतीसमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. यात कार्यकर्त्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नापास विद्यार्थ्यांना पुन्हा प्रथम सत्राला प्रवेश घेण्यासाठी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य बंधनकारक करत आहेत. यात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्तीही मिळणार नसल्याचे ‘आरएसएफ’तर्फे कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर संघटनेतर्फे तीन तास महाधरणे आंदोलन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांमुळे विद्यापीठ परिसर दणाणून गेला होता. शेवटी प्रभारी अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रा. सुनील मगरे, नागराज गायकवाड, नितीन वाकेकर, प्रकाश पारदे, विशाल सोनवणे, आशिष वाघ, राहुल हिवाळे, चिन्मय पेटकर, अक्षय मुंगे, शोएब शेख, विजय भालेराव, कुलदीप सातदिवे, सतीश भालेराव, प्रणय काळे, अजय भगत, संदीप वाघ, सारंग नकवाल, सुधीराय गायकवाड, पंकज गवई आदींनी सहभाग नोंदवला.