शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा स्क्रॅप केल्याचा आरटीओला बनावट अहवाल देणाऱ्या एजंटला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 20:44 IST

जुनी रिक्षा वापरण्यायोग्य नसल्याने ती रिक्षा (एमएच- २० बीटी- ६४२०) भंगारात काढण्याचे निर्देश आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना दिले होते.

ठळक मुद्देस्क्रॅप करण्यासाठी रिक्षा घेऊन करोडी येथील आरटीओ कार्यालयात गेले नाही.रिक्षा स्क्रॅप केल्याचा सही आणि शिक्क्याचा बनावट अहवाल तयार केला

औरंगाबाद : २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या रिक्षाचे (स्क्रॅप) तुकडे केल्याचा मोटार वाहन निरीक्षकाचा बनावट अहवाल तयार करून आरटीओ कार्यालयात सादर करणाऱ्या रिक्षामालकासह एजंटविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी झटपट कारवाई करीत एजंटला शुक्रवारी अटक केली. मिर्झा अकबर बेग (रा. कटकटगेट) असे अटकेतील एजंटचे नाव आहे. या गुन्ह्यात रिक्षामालक शेख कमरोद्दीन शेख इस्माईल (रा. मकसूद कॉलनी) याचा पोलिसांनी शोध सुरू केला.

वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितले की, तक्रारदार रवींद्र दत्तात्रय नारळे हे येथील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक आहेत. कमरोद्दीन याच्या मालकीची जुनी रिक्षा वापरण्यायोग्य नसल्याने ती रिक्षा (एमएच- २० बीटी- ६४२०) भंगारात काढण्याचे निर्देश आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यांना दिले होते. त्यांच्या वतीने आरटीओ कार्यालयातील काम करण्याचे अधिकार त्यांनी एजंट अकबर मिर्झा याला दिले होते. दोघांनी ही रिक्षा करोडी येथील आरटीओ कार्यालयात घेऊन तेथे मोटार वाहन निरीक्षक नारळे यांच्यासमोर रिक्षा स्क्रॅप करतो, असे सांगितले. 

याबाबतचे आदेश त्यांनी स्टेशन रोडवरील आरटीओ कार्यालयाकडून घेतले. यानंतर ते रिक्षा घेऊन करोडी येथील आरटीओ कार्यालयात गेले नाही. उलट त्यांनी मोटार वाहन निरीक्षक नारळे यांच्यासमोर रिक्षा स्क्रॅप केल्याचा त्यांच्या सही आणि शिक्क्याचा बनावट अहवाल आरटीओ कार्यालयात सादर केला. याविषयी माहिती मिळताच नारळे यांनी हा अहवाल पाहिला असता त्यावर बनावट सही शिक्के मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रिक्षा वापरात ठेवण्यासाठी आरोपींनी संगनमत करून रिक्षा स्क्रॅप न करता बनावट अहवाल तयार करून फसवणूक केल्याचे त्यांना समजले. १० डिसेंबर २०२० ते २४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान हा प्रकार झाला. याविषयी त्यांनी आरोपी रिक्षामालक कमरुद्दीन आणि एजंट मिर्झा अकबरविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार नोंदविली. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एजंटला अटक केली..... 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी