शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

सिडकोतील अग्रसेन चौक अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:31 IST

औरंगाबाद : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जालना रस्त्यावरील अग्रसेन चौक कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. आकाशवाणी चौक बंद करण्याबाबत नागरिकांची मते

औरंगाबाद : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जालना रस्त्यावरील अग्रसेन चौक कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. आकाशवाणी चौक बंद करण्याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता नागरिकांची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली.सिडकोचा उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. विमानतळाकडून येणाऱ्या वाहनांमुळे अग्रसेन चौकात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या चौकातून वाहनचालकांना आता ‘यू- टर्न’ घेता येणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर सोमवारी व मंगळवारी हा चौक बंद केला जाईल. उड्डाणपूल खुला झाल्यानंतर मात्र तो कायमस्वरुपी बंद केला जाईल. अग्रसेन चौक बंद केल्याने एन-३ चौकातील टी पॉइंटवर वाहनांची वर्दळ वाढून कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या चौकाबाबतही नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. आकाशवाणी चौकाची अभियांत्रिकीदृष्ट्या रचना चुकीची असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. हा चौक यापूर्वी वाहतुकीसाठी बंद केला होता. चौक कायमस्वरुपी बंद करावा का, यासाठी मनजितनगर व इतर भागातील नागरिकांची मते जाणून घेतली जातील. त्यासाठी बुधवारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीस संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.