शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उद्रेकाचा परिणाम; लसीकरण केल्यानंतरही २१ जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:45 IST

corona virus in Aurangabad लसीकरणानंतर कोरोना संसर्ग कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 

ठळक मुद्देकाही जण पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित तर काही जण दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत पॉझिटिव्ह

औरंगाबाद : मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार वाढल्याने भीतीने असंख्य नागरिक लस घेत आहेत. संसर्ग वाढत असतानाच लसीकरण झालेले रुग्णही पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. लस घेतलेले आतापर्यंत २१ जण कोरोना बाधित झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरणाची मोहीम तीव्र करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शहरात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ट नागरिक, आजारी व्यक्तींना लस दिली जात आहे. १६ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे ४६ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणानंतर कोरोना संसर्ग कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या डॉ. जोगदंड यांनी सांगितले की, पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर घ्यायचा आहे. त्यानंतर १४ दिवसानंतर ‘हर्ड इम्युनिटी’ तयार होईल. त्यानंतर ७० टक्क्यांपर्यंत लस घेतलेल्या व्यक्तींना संरक्षण मिळेल. त्यामुळे लस घेणे प्रत्येकाच्या फायद्याचेच आहे.

काही जण पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झाल्याचे तर काही जण दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसांच्या आत पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. लसीकरणानंतर ७० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळणार आहे. ३० टक्के धोका आहे. दोन डोस घेतल्यानंतरही जरी कोरोना संसर्ग झाला तरी जीवाला धोका राहणार नाही. सौम्य स्वरूपाचा त्रास असेल. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे डॉ. जोगदंड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद