हिंगोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ नंतर दिनांक ९ ते ३० जून २०१४ या कालावधीत छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला होता. यानंतरही मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू असून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात एकुण २२ लाख नवीन मतदारांची वाढ झाली आहे. हिंगोलीत जवळपास २0 हजार मतदार वाढले. हिंगोली जिल्ह्याची मतदारसंख्या जवळपास ८ लाख २८ हजार झाली आहे.विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला. नवीन मतदार नोंदणीसाठी (नमुना-६) अर्ज विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी त्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची तात्काळ खात्री करून घ्यावी, त्यासाठी नागरिकांनी संबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा १८००२२१९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा ँ३३स्र://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.ज्या नागरिकांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाची नोंद करावयाची असेल त्यांनी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये किंवा मतदार मदत केंद्रामध्ये आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या पुराव्यासह तात्काळ अर्ज सादर करावा. ज्या नागरिकांकडे जूने मतदार ओळखपत्र आहे; परंतु त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळले गेले आहे. अशा नागरिकांनी त्यांच्या सामान्य रहिवासाचा पत्ता, मतदार ओळखपत्राप्रमाणेच असल्यास जुन्या मतदार ओळखपत्राच्या छायाप्रतींसह नमुना-६ मध्ये अर्ज करणे आवश्यक राहील. त्यांना पुरावे सादर करण्याची गरज राहणार नाही, असेही कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल २२ लाख नवीन मतदारांची नोंदणी
By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST