शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पावसाअभावी खरीप पिके गेली करपून

By admin | Updated: October 27, 2014 00:12 IST

सिल्लोड : यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने ऐनवेळी हिरावून घेतला.

सिल्लोड : यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने ऐनवेळी हिरावून घेतला. एका पाण्यामुळे मका पीक उद्ध्वस्त झाले. कपाशीच्या सर्व फुले, पात्या गळाल्या. चवळी, उडीद, मूग यावर्षी झाले नाही. आवक नसल्याने शेतकऱ्यांनी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.सिल्लोड शहरात सर्व दुकानांवर शुकशुकाट दिसून आला. नोकरवर्ग, व्यापारी, मध्यमवर्गीय थोड्याफार प्रमाणात खरेदी करताना दिसत होते, तर शेतकऱ्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह दिसून आला नाही. गेल्या महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीचा प्रचार व राजकीय धुळवड बघायला मिळाली. या धुळवडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष दिले नाही. त्यामुळे या दुष्काळाचे चटके केवळ अन् केवळ शेतकऱ्यांना खावे लागले. विजेचा प्रश्न पाण्याची चिंता यापेक्षा निवडणूक महत्त्वाची असल्याने सर्वजण प्रचारात मग्न दिसले. याचा परिणाम बाजारपेठेवर दिसत आहे. साध्या पद्धतीने शेतकऱ्यांनी दिवाळी शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट साजरी केली. आता डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. मागील वर्षी गारपिटीमुळे शेतकरी त्रस्त होते तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी वैतागले आहेत. उशिरा पेरणी झाल्याने म्हणावी तशी कोरडवाहू कपाशी उगवली नाही, विजेच्या लपंडावामुळे विहिरीतील पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांना करता आले नाही. परिणामी उत्पादन घटणार हे निश्चित. यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात काही मोजक्या भागात विहिरींना पाणी आहे, तर अनेक विहिरी आटल्या आहे, यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी तथातथाच दिसत आहे. पिके कोमात आणेवारी जोमातबाजारसावंगी- एकीकडे पावसाअभावी खरीप पिके कोमात असून नाले, तलाव, विहिरी कोरड्याठाक असताना रबी पेरणीस शेतकरी धजावत नसताना महसूल खात्याची आणेवारी मात्र जोमात दिसून येत आहे. महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पिके कोमात असतानाही चालू वर्षीची बाजारसावंगी परिसराची आणेवारी ५८ टक्क्यांच्या वर असल्याची नोंद केली आहे. महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आणेवारी ठरवण्याऐवजी कार्यालयात बसून आणेवारी ठरवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत येथील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात बाजारसावंगीपरिसरातील शेतकऱ्यांची सरपंच भीमराव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन निषेध करण्यात आला. उपसरपंच भाऊराव काटकर, बाळकृष्ण लोंढे, पुंजाजी नलावडे, अप्पासाहेब जाधव, गुलाबराव लोंढे, विष्णू नलावडे, चाँद पठाण, सुभाष धनेधर, गणेश नलावडे व इतरांनी कार्यालयात बसून ठरविण्यात आलेली आणेवारी रद्द करून प्रत्यक्ष पाहणी करून कमीची आणेवारी दाखवावी, नसता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.