शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

देशात ‘जांब’नंतर भालगावात श्रीराम-सीतेची दुसरी मूर्ती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 31, 2023 19:07 IST

छत्रपती संभाजीनगरच्या जवळ भालगावात आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेली श्रीराम-सीतेची मूर्ती

छत्रपती संभाजीनगर : शहराकडून बीडकडे जाताना अवघ्या २० किमी अंतरावर भालगावात श्री रामचंद्र मठ आहे. जिथे समर्थ रामदास स्वामींंनी स्वत: ३९३ वर्षांपूर्वी श्रीराम व सीतेच्या मूर्तीची स्थापना केली. येथील मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘वामांकारूढ सीता’ म्हणजे रामाच्या मांडीवर बसलेली सीतेची पंचधातूची दुर्मीळ अशी मूर्ती आहे.

भालगावात एकीकडे काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे. त्याच्या पूर्व बाजूस भालगावात जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. तो रस्ता सरळ श्रीरामचंद्र मठापर्यंत जाऊन पोहोचतो. डाव्या बाजूस एक जुना चिरेबंदी वाडा दिसतो. तोच श्री रामदास स्वामींनी स्थापित केलेला ‘श्री रामचंद्र मठ’ आहे. या मठात एका गाभाऱ्यात काळ्या सागवानी लाकडाचे मोठे देवघर दिसते. त्याच देवघरात श्रीराम व सीतेची पंचधातूची मूर्ती नजरेस पडते. याशिवाय श्रीरामाच्या उजव्या बाजूला हनुमान, तर सीतेच्या डाव्या बाजूला गरुडाची मूर्तीही लक्ष वेधून घेते. त्यानंतर बालाजी, देवीच्या मूर्ती येथे आहे. देवघराच्या दोन्ही बाजूला पितळाची ५ फुटी समई तसेच समोरील बाजूस दगड्याच्या समई दिसतात. याच मंदिरात काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. रामनवमीला येथे मोठा उत्सव असतो.

देशात दोनच मूर्तीश्रीरामरक्षा स्तोत्रमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ‘ वामांकारूढ सीता’ १) भालगाव येथील श्रीरामचंद्र मठातील हीच ती श्रीराम-सीतेची पंचधातूची मूर्ती.२) श्री रामचंद्र मठाचा चिरेबंदी वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार. म्हणजे श्रीरामाच्या मांडीवर बसलेली सीता अशी पहिली मूर्ती जालना जिल्ह्यातील ‘जांब’ या त्यांच्या जन्मस्थानी व दुसरी मूर्ती छत्रपती संभाजीनगरातील भालगाव येथे आहे.

११०० मठांपैकी एक भालगावातस्वामी समर्थ रामदास स्वामी यांनी देशभरात ११०० ठिकाणी मठाची स्थापना केली होती. त्यातील एक भालगावचा श्रीरामचंद्र मठ आहे. हा मठ सुकना नदीच्या काठावर उभारला आहे. त्याकाळी निजामाची खडकी (छत्रपती संभाजीनगर) ही राजधानी असल्याने येथील राजकीय हालचालींवर लक्ष रहावे, या हेतूने स्वामींनी भालगावात मठ उभारला होता.

त्र्यंबकराज हे मठाचे पहिले महंतभालगावात श्रीरामचंद्र मठाची स्थापना करून श्री रामदास स्वामी यांनी त्यांचे पट्ट शिष्यांपैकी एक असलेले त्र्यंबकराज (भोळाराम) यांना मठाचा महंत नेमून ते पुढे टाकळीला रवाना झाले. भोळाराम यांच्या नावावरून नंतर या गावाला भालगाव नाव पडले. त्यांच्या नंतर हरिहर देशमुख, रघुवीर स्वामी, खंडेराव स्वामी असे महंत झालेत. सध्याचे सुरेश स्वामी जहागिरदार हे नवव्या पिढीतील आहेत. आता या कुटुंबाची दहावी पिढी आपल्या पूर्वजांचा धार्मिक वारसा पुढे नेत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक