शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शिवतेजाची सुप्रभात; क्रांती चौकातील पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 12:32 IST

१८ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. दे

औरंगाबाद : शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजता करण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यकर्ते आणि शिवप्रेमी यांच्यात पुतळ्याच्या अनावरणावरून शाब्दिक संघर्ष सुरू होता, त्याला मंगळवारी पूर्णविराम देण्यात आला असला, तरी मध्यरात्रीच्या मुहूर्तावरून शिवजयंती उत्सव समिती, शिवप्रेमी जनतेतून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

१८ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्वाधिक उंचीचे शिवछत्रपतींचे शिल्प क्रांती चौकात असून, ते पुण्यातील शिल्पकार दीपक थोपटे यांनी घडविले आहे; तर चबुतरा व परिसराचे सौंदर्यीकरण महापालिकेने केले आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे.

डीजेला परवानगीजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी विशेष आदेशानुसार डीजे, साऊंड-सिस्टीम, वादक, कलाकार व लग्नसमारंभातील वाद्यांसाठी परवानगी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या कलाकारांनाच वाद्यवृंदांच्या पथकात सहभागी होता येईल.

सरकारला वेळ नसल्यामुळे हा मुहूर्तसरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दिवसा अनावरण करण्यासाठी वेळ नसल्याने हा मुहूर्त काढल्याचे दिसते आहे. अठरापगड जातीचे हे दैवत असून, दिवसा अनावरण केले असते तर आनंद द्विगुणित झाला असता. सरकारच्या या निर्णयामुळे शिवप्रेमी जनता त्यांना माफ करणार नाही.- बबन डिडोरे, संस्थापक-अध्यक्ष, नवीन औरंगाबाद शिवजयंती महोत्सव समिती

ना ढोल, ना ताशे, ना शिवप्रेमीना ढोल, ना ताशे, ना शिवप्रेमी, फक्त शासकीय नियमांचे पालन करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणे हे खूप दुर्देवी आहे. शिवप्रेमींनी ज्या पुतळ्यासाठी तीन वर्षे वाट पाहिली, त्यांचा आता भ्रमनिरास होणार आहे. साजेसा आणि तोलामोलाचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. वेळेचा पुनर्विचार मनपाने करावा, अशी अपेक्षा आहे.- प्रा. मनोज पाटील, कार्याध्यक्ष, जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती

टॅग्स :kranti chowkक्रांती चौकAurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज