शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री बदलल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वनियोजित अनेक कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 18:48 IST

जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपासह जिल्ह्यात विविध २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातील कामांना ब्रेक लागला आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपासह जिल्ह्यात विविध २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातील कामांना ब्रेक लागला आहे. 

जानेवारी २०१८ मध्ये पालकमंत्री कदम यांच्या जागी डॉ. दीपक  सावंत यांच्यावर पदाची जबाबदारी देण्यात आली. आठ महिन्यांत सावंत यांनी पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी नियोजित केलेल्या कामांचा साधा आढावाही घेतला नसल्याची ओरड सुरू आहे.  जिल्हा नियोजन समितीतून पालिकेला मोठ्या प्रमाणात निधी देऊनही बहुतांश कामे रेंगाळली आहेत. अडीच वर्षांपासून कुठलेही काम गतीने पूर्ण केलेले नाही. 

नियोजित केलेल्या कामांचे प्रस्ताव पुढे येण्यासाठी वर्षामागून वर्षे जात आहेत, तरीही कामे पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रहालयाचे दुसऱ्या टप्प्याचे काम रेंगाळले आहे. विमानतळासमोर लेण्यांचे म्युरल्स लावण्याच्या कामाला गती आलेली नाही. चिकलठाणा येथील २०० बेड्सच्या हॉस्पिटलला पाणीपुरवठा करण्याचे काम आजवर झालेले नाही. दरम्यान, त्या हॉस्पिटलचे लोकार्पणही आजवर झालेले नाही.

सफारी पार्कसाठी जिल्हा प्रशासनाने मनपाच्या ताब्यात जागा दिली आहे; परंतु सफारी पार्कबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. ५० खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचे कामही रेंगाळले आहे. जिल्हा नियोजन समितीने त्या कामासाठी अनुदान दिले; परंतु पालकमंत्री बदलताच त्या कामालाही ग्रहण लागले. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचे काम पुढे का सरकत नाही.

संत एकनाथ रंगमंदिरासाठी समिती गठित करून मुंबईतील कालिदास नाट्यगृहाप्रमाणे ते सुशोभित करण्याबाबतच्या प्रस्तावानुसार २ कोटी रुपये संत एकनाथ रंगमंदिरासाठी डीपीसीतून मंजूर करण्यात आले. त्यानुसार सध्या काम सुरू आहे. जांभूळवनामध्ये केलेल्या वृक्षारोपणाकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. कटकटगेटमधील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची कामे रखडली आहेत. डीपीसीने निधी दिलेल्या हॉस्पिटल्सची कामे रेंगाळली आहेत. शासकीय दूध डेअरीची जागा हॉस्पिटल्ससाठी ताब्यात आली नाही. पर्यटनस्थळ विकास कार्यक्रम ठप्प पडलेला आहे. कटकटगेट परिसरात हॉस्पिटलसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली; मात्र तेही रेंगाळले आहे. 

समित्यांच्या बैठका नाहीत, नियुक्त्या रखडल्याजिल्हा पातळीवर अशासकीय सदस्यांच्या ६० समित्या आहेत. त्यातील बहुतांश समित्यांची एकही बैठक आजवर झालेली नाही, तसेच विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या नियुक्त्यादेखील देण्यात आलेल्या नाहीत. निवडणुकांसाठी १ वर्ष राहिले असून, किमान आता तरी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदguardian ministerपालक मंत्रीRamdas Kadamरामदास कदम