शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांनंतर पहिल्यांदाच सरकार गावठाण पाहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 11:54 IST

औरंगाबादेतील १ हजार ८२ गावांतील गावठाणांची पाहणी दोन आधुनिक ड्रोनच्या साह्याने होणार

ठळक मुद्देड्रोनच्या सहाय्याने औरंगाबाद जिल्ह्यात १० जुलैपासून पथदर्शी प्रकल्पसर्व्हे ऑफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे गावठाण मिळकतींची पाहणी करण्यात येईल.

- विकास राऊत 

औरंगाबाद : ब्रिटिश राजवटीत राज्यातील गावठाणांची पाहणी करण्यात आली होती. ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर पहिल्यांदाच शासन गावठाणांची पाहणी करून हद्द ठरविणार आहे. राज्यात पुणे व औरंगाबाद जिल्ह्यांत पथदर्शी म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. १० जुलैपासून औरंगाबादेतील १ हजार ८२ गावांतील गावठाणांची पाहणी दोन आधुनिक ड्रोनच्या साह्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख उपसंचालक संजय डिकले यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

सर्व्हे ऑफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे गावठाण मिळकतींची पाहणी करण्यात येईल. जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) नुसार ड्रोनने पाहणी केलेल्या प्रतिमा क्यूबे जोडणीतून एकमेकांना जोडल्या जातील. पुण्यातील प्रयोगशाळेत सर्व माहिती पाठविण्यात येईल. त्यानंतर गावठाणाचे जे नकाशे तयार होतील, ते ग्रामपंचायत सरपंचांना सादर करण्यात येतील. या ड्रोनच्या पाहणीत गावठाणाची मूळ हद्द, सद्य:स्थिती, अतिक्रमण, वाढीव बांधकामांसह हद्द निश्चित करण्यात येईल. नमुना ८ (अ) नुसार चौकशी अधिकारी गावठाणांच्या माहितीची पडताळणी करतील. यासाठी ७० ते ८० जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. एका दिवसात ५ गावांची पाहणी करण्यात येणार आहे, असे डिकले यांनी नमूद केले. 

१९६४ साली शासनाने राज्यातील गावठाणांना सर्व्हे क्रमांक दिले होते. त्याला ब्रिटिशांनी केलेल्या पाहणीचा आधार होता. त्यानंतर २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांना नगर भूमापन क्रमांक देण्यात आले. २ हजार लोकसंख्येवरील गावांना सजा निर्माण केला. राज्यातील ४० हजार गावांपैकी ४ हजार ६७९ गावांंची ९४ पर्यंत पाहणी केली. त्यानंतर तालुका पॅटर्न आला. जिल्ह्यात ८५३ गावांत २ हजारांच्याजवळ लोक संख्या आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय गावसंख्या औरंगाबाद तालुक्यातील १४४ गावे, कन्नड १५६, पैठण १५७, गंगापूर १८७, फुलंब्री ८०, खुलताबाद ६८, सिल्लोड ९८, वैजापूर १५० आणि सोयगाव तालुक्यातील ७५ गावांतील गावठाणांची ड्रोनद्वारे पाहणी करण्यात येणार आहे. या तालुक्यातील गावठाण मालमत्तांचे जीआयएस रेखांकन करणे, प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे, खुली जागा व रस्त्याचा नकाशा तयार करणे. घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे, ग्रामपंचायतीने व शासनाने अ‍ॅसेट रजिस्टर तयार करणे. पाहणीची सर्व माहिती ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत देण्यात येईल. या कामासाठी तांत्रिक मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात येत आहे. त्या पुस्तिका समितीचे प्रमुख म्हणून उपसंचालक डिकले यांच्याकडे जबाबदारी आहे. औरंगाबाद व पुण्यानंतर राज्यभर गावठाण पाहणीसाठी ती पुस्तिका उपयुक्त ठरेल, असे डिकले म्हणाले.

पाहणीसाठी ८ कोटींचा खर्चजिल्ह्यातील १०८२ गावांतील गावठाणांवर प्रती गाव ७५ हजार रुपयांप्रमाणे ८ कोटी ११ लाख ५० हजार खर्च होण्याचा अंदाज आहे. राज्यातील ३९ हजार ७३३ गावांतील गावठाणांची पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभागाला ७६ कोटी तर भूमी अभिलेख संकलनासाठी लागणाऱ्या यंत्रणेवर २९८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकारRevenue Departmentमहसूल विभाग