शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

१२ वर्षांच्या वनवासानंतर शिवाला मिळाली मायेची ऊब; पळशीच्या दाम्पत्याने घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:32 IST

पळशी (ता. सिल्लोड) : जन्मदात्या आईने कचऱ्याच फेकले. एका साधूने मुंबईत नऊ वर्षे सांभाळ केला. नंतर हतनूर (ता. कन्नड)च्या महाराजाने तीन वर्षे सांभाळ केला. अशा साधूंच्या सहवासात वाढलेल्या शिवाला संगीत आणि भजनाची आवड जडली. याच संगीताने त्याला आई-बाबा मिळवून दिले. तब्बल १२ वर्षांच्या वनवासानंतर शिवाला आईच्या मायेची ऊब मिळाली. सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील सुलोचना राऊत (४०), देवीदास राऊत (४५) या दाम्पत्याने त्याला ११ मार्च रोजी दत्तक घेतले.

अंबादास बडकपळशी (ता. सिल्लोड) : जन्मदात्या आईने कचऱ्याच फेकले. एका साधूने मुंबईत नऊ वर्षे सांभाळ केला. नंतर हतनूर (ता. कन्नड)च्या महाराजाने तीन वर्षे सांभाळ केला. अशा साधूंच्या सहवासात वाढलेल्या शिवाला संगीत आणि भजनाची आवड जडली. याच संगीताने त्याला आई-बाबा मिळवून दिले. तब्बल १२ वर्षांच्या वनवासानंतर शिवाला आईच्या मायेची ऊब मिळाली. सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील सुलोचना राऊत (४०), देवीदास राऊत (४५) या दाम्पत्याने त्याला ११ मार्च रोजी दत्तक घेतले.शिवाच्या वनवासाची सुरूवात जन्मत:च म्हणजे १२ वर्षांपूर्वी झाली. मुंबई-कसारा घाटातील शिव मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एक साधू दर्शनाला जात असताना रस्त्याच्या कडेला कचरा कुंडीतून रडण्याचा आवाज आला. त्यांनी कुंडीत पाहिले तर नवजात अर्भक रक्ताने माखलेले आढळून आले. या साधूबाबांना दया आली व त्यांनी ते नवजात अर्भक सोबत घेऊन मुंबई गाठली. महादेवावर श्रद्धा असेल त्यांची. त्यामुळे शिवा नाव ठेवले. नऊ वर्षे त्याचा सांभाळ केला. या काळात साधूबाबांनी शिवाला त्र्यंबकेश्वर, वेरुळ, पंढरपूर या तीर्थस्थळाची दर्शनवारी घडविली. नऊ वर्षांनंतर त्या साधूबाबांनी शिवाला ‘तू आता तुझा उदरनिर्वाह करु शकतो, मला हिमालयात जायचे आहे, असे सांगत मुंबई रेल्वे स्टेशनवर सोडून ते निघून गेले. त्यानंतर शिवाने वर्षभर रेल्वे स्टेशनवर ‘कुली’चे काम केले. या दरम्यान त्र्यंबकेश्वरला जाण्याची इच्छा त्याच्या मनात जागृत झाली. त्याने कमावलेल्या पैशातून एक सायकल विकत घेतली व त्यावरुन त्र्यंबकेश्वर गाठले. काही दिवस तेथे राहिल्यानंतर सायकल विकून त्या पैशातून बसने वेरुळ गाठले. काही दिवस तेथेच राहिला. काम मिळाले नाही म्हणून तेथून खुलताबादला आला. खुलताबाद येथील एका हॉटेलमध्ये कामाला राहिला. काम करत असताना हॉटेल मालक संदीप बारगळ यांना त्याची कहाणी ऐकून गहिवरुन आले. त्यांनी स्थानिक पोलीस व गल्लेबोरगाव येथील सिद्धेश्वर महाराजांच्या मदतीने त्याला हतनूर (ता. कन्नड) येथील श्रीकृष्ण महाराज यांच्या आश्रमात पाठवले. महाराजांनी तेथे त्याचा मुलासारखा सांभाळ केला.शिवाला संगीत व भजनांची आवड. बोधेगाव (ता. फुलंब्री) येथे २०१७ मध्ये महाशिवरात्रीला भजन स्पर्धा ठेवण्यात आली होती. यात शिवाने दुसरा क्रमांक मिळवला होता. पळशी येथील देविदास राऊत यांनाही संगीत व भजनाची आवड असल्याने योगायोगाने तेही या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. शिवाच्या या कलेने देविदास यांच्या मनात घर केले. त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करुन अनाथ शिवाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. श्रीकृष्ण महाराज यांना शिवाला दूर करु वाटले नाही. त्यांनी प्रेमापोटी टाळाटाळ केली. परंतु राऊत दाम्पत्याने हट्ट सोडला नाही. अखेर ११ मार्च रोजी या दाम्पत्याने शिवाला दत्तक घेतले. पळशीत आल्यानंतर गावात आनंद साजरा करण्यात झाला. गावकºयांसह परिसरातील नागरिकांमधून राऊत दाम्पत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिवाला आई-वडील मिळाल्याने तोही देवाची कृपा मानून सर्वांचे आभार मानत आहे.