शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

जि.प.च्या सातशे शाळा घेणार दत्तक

By admin | Updated: June 14, 2016 23:53 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा सुधारावा, या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून जि.प.चे अधिकारी आणि कर्मचारी हे जिल्ह्यातील जवळपास ७०० शाळा दत्तक घेणार आहेत

औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा सुधारावा, या हेतूने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून जि.प.चे अधिकारी आणि कर्मचारी हे जिल्ह्यातील जवळपास ७०० शाळा दत्तक घेणार आहेत. हे अधिकारी, कर्मचारी वर्षभरात तब्बल १० महिने या शाळेला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीवर ‘वॉच’ ठेवतील.यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, यासंबंधीचे आदेश आपण आजच (सोमवारी) निर्गमित केले असून, यामध्ये जि. प. तसेच पंचायत समित्यांचे जवळपास ७ अधिकारी- कर्मचारी असतील. हे अधिकारी- कर्मचारी १५ जून अर्थात शाळेच्या प्रवेश दिवसापासूनच या अभियानाला सुरुवात करतील. प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी. शाळेत दर महिन्याच्या मंगळवारी दत्तक घेतलेल्या शाळेत सकाळी परिपाठापासून दुपारच्या मध्यान्ह भोजनापर्यंत अधिकारी- कर्मचारी शाळेत थांबतील. त्यामुळे ग्रामस्थांचा सहभागही वाढेल आणि शाळेची भौतिक तसेच शैक्षणिक सुधारणा होईल. दैनंदिन अडचणी सोडविणे सोपे जाईल.वर्षातील दहा महिन्यांचा हा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांच्याकडे यासंबंधीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असून, ते सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना शाळा दत्तक योजनेची कल्पना देतील. सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील एक-एक शाळा दत्तक दिली जाणार असून, प्रत्येकाने शाळेला वर्षात किमान दहा व्हिजीट करणे आवश्यक आहे. या शाळांमधील मासिक चाचण्या ज्या अगोदर कागदावरच चालायच्या याच्यावरदेखील वॉच ठेवला जाणार आहे.