शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

भौतिक सुविधा नसलेल्या आणखी ५ काॅलेजमध्ये प्रवेश बंदी, ४ काॅलेजला २ लाखांचा दंड

By योगेश पायघन | Updated: August 22, 2022 19:27 IST

आतापर्यंत १७ महाविद्यालयांवर कारवाई - उर्वरीत ५ महाविद्यालयांची सुनावणी लवकरच

औरंगाबादभाैतिक सुविधा नसलेल्या १२ महाविद्यालयांवर कारवाई झाली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आणखी पाच महाविद्यालयांतील सुविधा नसलेल्या अभ्यासक्रमांना 'नो ॲडमीशन झोन'मध्ये टाकले. तर चार महाविद्यालयांना प्रत्येकी २ लाखांचा दंडात्मक कारवाईचा बडगा कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी उगारला. यातून गुणवत्ता आणि सुविधांमध्ये तडजोड मान्य करणार नसल्याचा इशारा महाविद्यालयांना दिला.

पाच महाविद्यालयांची सुनावणी १२ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यात घेतलेल्या निर्णयाचे आदेश सोमवारी कुलगुरू डाॅ. येवले यांनी दिले. शेंद्रा येथील पिपल्स फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरेटी काॅलेजमधील बीएस्सी फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी एक तुकडी, बीएस्सी नॉन कन्व्हेशनल अँड कन्व्हेशनल एनर्जी एक तुकडी, एमएस्सी अप्लाइड फिजिक्स अँड बॅलेस्टिक्स एक तुकडी, एमएस्सी फॉरेन्सिक अँड टॉक्सिकालॉजी एक तुकडी या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन प्रवेश बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. शरणापूर फाटा, टी-पॉइंट येथील डीएसआर अध्यापक महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या बीएड अभ्यासक्रमाची एक तुकडी, एमएड पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एक तुकडीचे नवीन प्रवेश बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. कन्नड तालुक्यात हतनूर येथील राष्ट्रिय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एमए राज्यशास्त्र, एमए इतिहास या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विनाअनुदानित तत्वावरील प्रत्येकी एका तुकडीचे नवीन प्रवेश बंद करण्यात आले. 

तसेच पैठण येथील मॅजिक कम्प्युटर अकॅडमी महाविद्यालयात सुरू असलेल्या डीसीए अभ्यासक्रमाची एक तुकडी, बीसीएम एक तुकडी, बीएससी संगणकशास्त्र एक तुकडी, एमसीएम एक तुकडी या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन प्रवेश बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. या चार महाविद्यालयास प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड १५ दिवसांत भरा अन्यथा ७ टक्के व्याज आकरण्याचे आदेश कुलगुरूंनी दिली. तर बीड येथील मिलीया महाविद्यालयातील एमएस्सी संगणकशास्त्र एक तुकडी, एमए इंग्रजी एक तुकडी या अभ्यासक्रमाचे नवीन प्रवेश बंद करण्यातचे निर्देशित करण्यात आले.

कारवाईचा दिसतोय सकारात्मक परिणामतपासणीच्या प्रक्रियेत असलेल्या उर्वरीत पाच महाविद्यालयांची सुनावणी लवकरच होईल. हि निरंतर प्रक्रीया असून पुढील टप्प्यातील महाविद्यालयांची तपासणी लवकरच सुरू होईल. या कारवाईमुळे महाविद्यालये सुविधा नसतील तर स्वत:हून बंद करत आहेत. तसेच अध्यापकांची भरती करत असल्याचा सकारात्मक प्रयत्न दिसून येत आहे.-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद